एक्स्प्लोर

Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, AstraZeneca कंपनीला DCGI ची परवानगी

Breast Cancer Medicine : एस्ट्राजेनेका (AstraZeneca) कंपनीच्या 'लिनपरजा' या स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी DGCI ने मंजुरी दिली आहे.

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे. यावर उपाय सापडला आहे. एस्ट्राजेनेका (AstraZeneca) कंपनीच्या 'लिनपरजा' (Lynparza) या स्तनाच्या कर्करोगावरील औषध  भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी भारतीय औषध नियामक प्रशासनाने म्हणजेच DGCI ने मंजुरी दिली आहे. स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे याचं निदान फार उशिराने होते, परिणामी उपाय करण्यात उशीर होतो. यामुळे स्तनाच्या कर्करोगामुळे महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. मात्र आता या समस्येवर उपाय उपलब्ध आहे. यामुळे आता स्तनाच्या कर्करोगाचं वेळीच निदान होऊन त्यावर उपचार करता येणार आहे. 

फार्मा कंपनी एस्ट्राजेनेका इंडियाला (AstraZeneca India) शुक्रवारी म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी भारतीय औषध नियामक प्रशासनाने (DCGI) परवानगी दिली आहे. त्यामुळे एस्ट्राजेनेका इंडिया आता स्तनाचा कर्करोगावरील  (Breast Cancer) 'लिनपरजा' (Lynparza) या औषधाचं भारतीय बाजारात आणणार आहे. DCGIने कंपनीला 'लिनपरजा' (Lynparza) या औषधाच्या मार्केटींगसाठी मंजुरी दिली आहे. 

स्तनाच्या कर्करोगावर 'लिनपरजा' औषध (Lynparza) 

सुरुवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग असलेल्या प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) Lynparza (Olaparib) औषधाला मोनोथेरपी म्हणून मान्यता दिली आहे. हे स्तनाच्या कर्करोगावरील पहिलं मंजुरी मिळालेलं औषध आहे. या औषधाला भारतासह अमेरिका, युरोपीय संघ, जपानसोबतच इतर देशांनीही मान्यता दिली आहे.

स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या

एस्ट्राजेनेका इंडियाचे (AstraZeneca India) व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) गगनदीप सिंह (Gagandeep Singh) यांनी सांगितलं की, स्तनाचा कर्करोग हा जगभरातील सर्वात जास्त निदान झालेल्या कर्करोगांपैकी एक आहे, दरवर्षी अंदाजे 23 लाख रुग्णांवर उपचार केले जातात. भारतात कर्करोगामुळे मृत्यूंपैकी 48 टक्के मृत्यू स्तनाच्या कर्करोगामुळे होतात. त्यामुळे भारतातील स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांवर आता वेळीच उपाय होणार आहेत.

एस्ट्राजेनेका इंडिया कंपनी (AstraZeneca India)

AstraZeneca India कंपनीची स्थापना 1979 मध्ये झाली असून याचं मुख्यालय कर्नाटकातील बेंगळुरू येथे आहे. AstraZeneca India ही ब्रिटनमधील AstraZeneca Plc या कंपनीची उपकंपनी आहे. AstraZeneca Pharma India Limited (AZPIL) ही ऑपरेटींग कंपनी आहे. ही कंपनी AstraZeneca कंपनीच्या औषधांची भारतात उत्पादन आणि विक्री करते.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget