सर्वसाधारण औषधांप्रमाणे Covishield आणि Covaxin लसी आता खुल्या बाजारात मिळणार, DCGI ची परवानगी
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने Covishield आणि Covaxin या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे.
![सर्वसाधारण औषधांप्रमाणे Covishield आणि Covaxin लसी आता खुल्या बाजारात मिळणार, DCGI ची परवानगी Covishield, Covaxin Regular market approval granted in the adult population सर्वसाधारण औषधांप्रमाणे Covishield आणि Covaxin लसी आता खुल्या बाजारात मिळणार, DCGI ची परवानगी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/26/8aaed104944a40b4b105ef01f83f1459_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Corona Vaccination : कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी देशभरात सध्या लसीकरणाला वेग आला आहे. Covishield आणि Covaxin या लसी सध्या उपलब्ध आहेत. या दोन्ही लसी खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) Covishield आणि Covaxin या दोन्ही लसींना मान्यता दिली आहे. म्हणजेच आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्येही इतर औषधांप्रमाणे कोरोना लस मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही लसींची प्रत्येकी किंमत 275 रुपये असणार आहे. तसेच यावर सर्व्हिस चार्ज 150 रुपये इतका लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान कोवॅक्सीनची सध्या खुल्या बाजारात 1200 रूपये किंमत आहे. तर कोविशील्डचा एक डोस 780 रुपये आहे. दोन्ही लसींवर 150 रुपये सर्व्हिस चार्ज आहे. सध्या देशात दोन्ही डोस आप्तकालीन वापरासाठी उपलब्ध आहे.
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने Covishield आणि Covaxin या लसींना खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्याने आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना देशभरातील वितरण व्यवस्था तयार करावी लागेल. परवानगी नंतर Covishield आणि Covaxin या लस रुग्णालय आणि मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होणार आहे.
खुल्या बाजारात विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर ज्यांना लस घ्यायची आहे, ते मेडिकल स्टोअरमधून लस विकत घेऊ शकता, अन् डॉक्टरकडून ती टोचून घेऊ शकतात. लसीला खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर देशातील लसीकरणाला आणखी वेग येईल. तसेच सरकारवरील भारही कमी होईल. लसीची किंमत ठरल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.
संबंधित बातम्या :
- COVID-19: फ्रंट लाईन वर्कर्ससाठी बूस्टर डोस आवश्यक, पालिकेनं पाठवला प्रस्ताव
- टास्क फोर्स आणि राज्य शासनानं बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी, मुंबई महापालिकेची भूमिका
- कोरोनाचा 'बूस्टर डोस' मोठा घोटाळा, तात्काळ रोखा, WHO चं आवाहन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)