Covid-19 Vaccination : इतर औषधांप्रमाणेच मेडिकलमध्ये मिळणार कोरोना लस, किंमत....; सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
Covid-19 Vaccination : मेडिकल स्टोअरमध्येही इतर औषधांप्रमाणे कोरोना लस मिळणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया खुल्या बाजारात लसींची किंमत किती असू शकते, यावर विचार करत आहे.
Corona Vaccination : कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी देशभरात सध्या लसीकरणाला वेग आला आहे. Covishield आणि Covaxin या लसी सध्या उपलब्ध आहेत. या दोन्ही लसी लवकरच खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) याला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच आता तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्येही इतर औषधांप्रमाणे कोरोना लस मिळणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया खुल्या बाजारात Covishield आणि Covaxin या लसींची किंमत किती असू शकते, यावर विचार करत आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Covishield आणि Covaxin या लसींची खुल्या बाजारात किंमत प्रत्येकी 275 रुपये असू शकते. तसेच यावर सर्व्हिस चार्ज 150 रुपये इतका लागू शकतो. म्हणजेच, खुल्या बाजारात Covishield आणि Covaxin या लसीची किंमत अंदाजे 425 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गतवर्षी Covishield आणि Covaxin या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली होती. आता लसींच्या आपत्कालीन वापराची अट शिथील करण्याची तयारी सुरु झाली आहे. Covishield आणि Covaxin या लसी खुल्या बाजारात विक्रीसाठी उपल्बध व्हाव्यात, यासाठी तज्ज्ञांचं एकमत झाल्याचं समजतेय. तसेच याला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडूनही दुजोरा मिळाला आहे. याच्या किंमतीवर सध्या चर्चा सुरु आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होऊ शकते.
The price of Covishield and Covaxin, which are expected to soon get regular market approval from DCGI, is likely to be capped at Rs 275 per dose plus an additional service charge of Rs 150, official sources said
— Press Trust of India (@PTI_News) January 26, 2022
जर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने Covishield आणि Covaxin या लसींना खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिली तर सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना देशभरातील वितरण व्यवस्था तयार करावी लागेल. परवानगी नंतर Covishield आणि Covaxin या लस रुग्णाल आणि मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होणार आहे.
खुल्या बाजारात विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर ज्यांना लस घ्यायची आहे, ते मेडिकल स्टोअरमधून लस विकत घेऊ शकता, अन् डॉक्टरकडून ती टोचून घेऊ शकतात. लसीला खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर देशातील लसीकरणाला आणखी वेग येईल. तसेच सरकारवरील भारही कमी होईल. लसीची किंमत ठरल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.
संबंधित बातम्या :