एक्स्प्लोर

नागपूर सावरतंय! 11 पोलीस ठाणे हद्दीतील प्रभावित क्षेत्रात संचारबंदी अनिश्चित काळासाठी कायम; टप्प्याटप्प्यात ढील देण्याचा पोलिसांचा निर्णय

Nagpur : सध्या तरी नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नसल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील काही भागातील संचारबंदी अनिश्चित कालासाठी लागू असणार आहे.

Nagpur Violence : छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या (Chhatrapati Sambhajinagar) औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागलं. परिणामी, कधी नव्हे ते उपराजधानीत ऐवढया मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Nagpur violence) उफाळल्याची घटना घडली. सध्या या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. सध्या नागपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. तर शहरातील संचार बंदी तर रुट मार्च काढला. (Police Route March) पोलिस अजून काही लोक अप्रिय घटना घडवण्याच्या तयारीत तर नाहीत ना याची पाहणी करुन अभ्यास करणार आहेत. तसेच परिसरातील नागरिकांच्या पाठीशी सुरक्षेसाठी पोलिस आहेत, असा विश्वास दर्शविणार आहेत. 

दुसरीकडे, सध्या तरी नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नसल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील काही भागात जी संचारबंदी लागू करण्यात आली आहे ती अनिश्चित कालासाठी लागू असणार आहे. तर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यात संचारबंदीमध्ये ढील देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

उपराजधानीचे जनजीवन आज सामान्य पद्धतीने सुरु

दरम्यान,आज (19 मार्च) नागपूरची दैनंदिन सुरवात नियमितप्रमाणे  झाली आहे. दंगल सदृश प्रभावित क्षेत्र वगळता आज नागपूरमध्ये जनजीवन सामान्य पद्धतीने सुरु आहे. नागपूर मेट्रो, शहर परिवहन सेवा, राज्य परिवहन सेवा देखील नियमित पद्धतीने सुरु आहेत. मात्र 11 पोलीस ठाणे हद्दीतील प्रभावित क्षेत्रात फक्त संचार बंदी लागू असणार आहे. दुसरीकडे नागपुरात काही भागात सध्या तणावपूर्वक शांतता आहे. मात्र खबरदारी म्हणून पोलिसांनी संचारबंदी क्षेत्रात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम 

नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गरज नसताना या भागातील लोकांनी  घराबाहेर निघू नये, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता  कायम असल्याचे दिसत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला

 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Kim Jong Un: किम जोंग उन यांचा गोळीबाराचा थरार; हातात बंदूक घेतली अन् धडाधड फायरिंग, नेमकं काय घडलं?
किम जोंग उन यांचा गोळीबाराचा थरार; हातात बंदूक घेतली अन् धडाधड फायरिंग, नेमकं काय घडलं?
Natasa Stankovic Flaunt In Yellow Bikini: बिकिनीमध्ये दिसली हार्दिक पांड्याची EX-वाईफ नताशा, फ्लॉन्ट केली कर्वी फिगर, लेकासोबत करतेय व्हेकेशन एन्जॉय
बिकिनीमध्ये दिसली हार्दिक पांड्याची EX-वाईफ नताशा, फ्लॉन्ट केली कर्वी फिगर PHOTOs
मोठी बातमी : LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget