Lay Avadtes tu Mala Colours Marathi Serial: सरकार, सानिकाचा पारंपरिक अंदाज; दोघांच्या वाढत्या प्रभावाचा काहींना राग, अडचणी वाढणार?
Lay Avadtes tu Mala Colours Marathi Serial: आनंद साजरा करत असतानाच, काहींना मात्र सानिकाच्या वाढत्या प्रभावाचा राग आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार हे बघणे रंजक असणार आहे.

Lay Avadtes tu Mala Colours Marathi Serial: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'लय आवडतेस तू मला' (Lay Avadtes tu Mala) मालिकेत गावात रोजगार निर्माण करून अनेक कुटुंबांना आधार देणाऱ्या सानिकाच्या प्रयत्नांना अखेर सर्वांच्या शुभेच्छा मिळत आहेत. तिच्या या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. सरकार सानिकाचा पारंपरिक अंदाज यानिमित्तानं मालिकेत दिसणार आहे. या मंगल प्रसंगी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करत असतानाच, काहींना मात्र सानिकाच्या वाढत्या प्रभावाचा राग आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार हे बघणे रंजक असणार आहे.
दरम्यान, सत्यनारायण पूजेच्या तयारीला जोरात सुरुवात झाली. संपूर्ण कुटुंब एकत्र आलं आणि कमलनं सानिकाला सून म्हणून स्वीकारल्यानंतर कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण झालं. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये सई आणि मिनल पुन्हा एकदा कट रचत होते. पूजेच्या वेळीच सईनं गुरुजींसमोर सरकार आणि सानिकाच्या विवाहासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यामुळे गुरुजी नाराज होतात आणि पूजा करण्यास विरोध करतात. सरकार सानिका यांची सत्यनारायणाची पूजा पार पडेल की नाही? हा प्रश्न उभा ठाकतो.
गावकऱ्यांनी आप्पांऐवजी सानिकाला दिलेल्या मान-सन्मानामुळे कमल नाराज होती, तर सईनं पुन्हा नवे डाव रचायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी सानिकाच्या नेतृत्वाखाली नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचं पाहून तिचं कौतुक केलं. सानिकाच्या प्रयत्नांमुळे गावाचा विकास होत असल्याचं सर्वांनी मान्य केलं. आप्पांनीही सानिकाच्या धडाडीचे कौतुक केलं आणि तिच्या या प्रयत्नांना पाठिंबा दिला. गावकरी आणि आप्पांच्या या प्रतिक्रियांमुळे कमल अधिक अस्वस्थ झाली, तिला वाटू लागले की, सानिका अप्पांची जागा घेत आहे. मात्र, सानिकानं तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला.
गावात रोजगार निर्माण करणारी सानिका आणि तिच्या वैवाहिक आयुष्यावर प्रश्न उपस्थित करणारी सई यांच्यातील हा संघर्ष आता कोणते नवे वळण घेणार? सत्यनारायण पूजेच्या साक्षीने सानिकाच्या कर्तृत्वाची कबुली मिळाली असली, तरी सईचा नवा डाव सरकार आणि सानिकाच्या नात्यावर काय परिणाम करणार? हे पाहणे प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक ठरणार आहे.























