कसे तयार होते आधार कार्ड? आवश्यक कागदपत्रे कोणती? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर
आधार कार्ड (Aadhaar Card) हे भारत सरकारने जारी केलेले एक महत्वाचं ओळखपत्र आहे. त्याच्या 12 अंकी बारकोड असतो. यामध्ये तुमच्याशी संबंधित अनेक माहिती असते.

Aadhaar Card : आधार कार्ड (Aadhaar Card) हे भारत सरकारने जारी केलेले एक महत्वाचं ओळखपत्र आहे. त्याच्या 12 अंकी बारकोड असतो. यामध्ये तुमच्याशी संबंधित अनेक माहिती असते. आधार कार्ड जारी करणाऱ्या संस्थेचे नाव युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आहे, जी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करते.
आधार कार्ड हे भारतातील एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, ज्याचा उपयोग सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि ओळखीचा पुरावा म्हणून केला जातो. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे, परंतु आवश्यक कागदपत्रे आणि योग्य माहितीची काळजी घेणे आवश्यक आहे. नुकतेच कॅबिनेट आणि निवडणूक आयोगाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकप्रमाणे मतदार कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर, ज्या लोकांकडे अद्याप आधार कार्ड नाही त्यांना हे जाणून घ्यायचे आहे की त्यांनी आधार कार्ड कसे बनवायचे आणि कोण त्यासाठी अर्ज करू शकत नाही? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
आधार कार्ड कसे बनते?
आधार कार्ड बनवण्यासाठी, सरकारने प्रत्येक शहरात आधार नोंदणी केंद्रे स्थापन केली आहेत, तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइट (https://uidai.gov.in) वर जाऊन तुमचे जवळचे आधार केंद्र शोधू शकता. यासोबतच तुम्ही आधार नोंदणी केंद्राची अपॉइंटमेंटही ऑनलाइन बुक करू शकता. याशिवाय तुम्ही थेट आधार नोंदणी केंद्रावरही जाऊ शकता.
आधारसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
ओळखीचा पुरावा (जसे की पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स).
पत्त्याचा पुरावा (वीज बिल, रेशन कार्ड, बँक स्टेटमेंट).
जन्म प्रमाणपत्र (जन्म प्रमाणपत्र, 10वी मार्कशीट).
मुलांसाठी आधार कार्ड आणि पालकांचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आधारसाठी बायोमेट्रिक डेटा संकलन
तुमच्या बोटांचे ठसे आणि बुबुळ आधार केंद्रावर स्कॅन केले जातील. याव्यतिरिक्त, तुमचा फोटो घेतला जाईल आणि तुम्ही दिलेली माहिती रेकॉर्ड केली जाईल.
नावनोंदणी स्लिप मिळवा
एकदा माहिती प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला एक नावनोंदणी स्लिप दिली जाईल, ज्यामध्ये नावनोंदणी क्रमांक (EID) असेल. या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही तुमच्या आधार अर्जाची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करू शकता. सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक जारी केला जातो. ही प्रक्रिया साधारणपणे 90 दिवसांत पूर्ण होते. तुमचे आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवले जाईल.
कोणला आधार कार्ड काढता येत नाही?
कोणताही परदेशी नागरिक आधार कार्डसाठी अर्ज करू शकत नाही. यासोबतच बेकायदेशीररीत्या देशात प्रवेश केलेले लोकही आधारसाठी अर्ज करू शकत नाहीत. याशिवाय मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी आधार अर्ज करता येणार नाही. जर कोणी चुकीची माहिती देऊन आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

