Allu Arjun Pushpa 2: 'पुष्पा 2'च्या 'जथारा' सीक्वेन्सवेळी गंभीर जखमी झालेला अल्लू अर्जुन; पाय मोडण्यापर्यंत पोहोचलेलं प्रकरण, मग...
Allu Arjun Pushpa 2: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट मेगा ब्लॉकबस्टर ठरला. पण तुम्हाला माहिती आहे का, की या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान अल्लू अर्जुनला खूप दुखापत झाली होती.

Allu Arjun Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2 : The Rule) चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. 'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम रचला. या चित्रपटानं जगभरात 1740 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचला. या चित्रपटातील सर्वात जास्त चर्चेत असलेला सीक्वेन्स 'जथारा' सीक्वेन्स होता. हा सीक्वेन्स पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावले, पण तुम्हाला माहीत आहे का? की 'जथारा' सीक्वेन्सचं शूटिंग नेमकं झालं कसं? 'जथारा' सीक्वेन्सचं शुटिंग काही सोपं नव्हतं. अल्लू अर्जुनला दुखापतही झाली, एवढंच काय तर त्याचा पायही मोडला. नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी नुकताच या गोष्टींचा खुलासा केला आहे.
'जथारा' सीक्वेन्सच्या शूटिंग दरम्यान अल्लू अर्जुनचा पाय मोडला
अल्लू अर्जुनने पुष्पा 2 : द रुलमध्ये त्याच्या अद्भुत नृत्यानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं, हे आम्ही तुम्हाला सांगतो. विशेषतः गंगो रेणुका थल्ली ('जथारा') या गाण्यादरम्यान, जिथे त्यानं देवी गंगम्मा थल्लीच्या सन्मानार्थ साडी, मेकअप आणि दागिने घातले होते. नृत्यदिग्दर्शक-अभिनेता गणेश आचार्य यांनी अलिकडेच अल्लू अर्जुनच्या समर्पणाचं कौतुक केलं आणि खुलासा केला की, चित्रीकरणादरम्यान अनेक दुखापती होऊनही अल्लू अर्जुननं त्याचा अभिनय सुरूच ठेवला. खरं तर, इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, गणेश आचार्य यांनी खुलासा केला की, 'जथारा' सीक्वेन्सचं शूटिंग अत्यंत आव्हानात्मक होतं आणि त्यात 29 दिवस सतत थकवणाऱ्या शेड्यूलचा समावेश होता. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेदरम्यानच्या प्रचंड उर्जेचं पूर्ण श्रेय अल्लू अर्जुनला दिलं.
गणेश आचार्य म्हणाले की, "त्यांनी दोन्ही पुष्पाच्या पार्ट्ससाठी पाच वर्ष डेडीकेट केलीत. 'जथारा'मध्ये त्यांनी साडी, घुंगरू, एक हार, एक ब्लाऊज आणि इतर काही प्रॉप्स वेअर करून परफॉर्म केले होतं. प्रत्येक 5-10 दिवसांत तो स्वतःला काहीना काहीतरी दुखापत करून घ्यायचा. कधी त्याचा पाय तुटून जायचा, तर कधी मानेला जखमा व्हायच्या. पण, त्यानं कधी हार मानली नाही."
अल्लू अर्जुनही झालेला नर्वस
अल्लू अर्जुननं द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "जेव्हा दिग्दर्शक सुकुमारनं त्याला पहिल्यांदा जथारा सीक्वेन्सबद्दल सांगितलं तेव्हा तो थोडासा घाबरला. ही कल्पना खूपच भयावह वाटत होती, आणि तो ती कशी साध्य करेल हे त्याला माहीत नव्हतं पण नेहमीप्रमाणे, त्यानं आव्हान स्वीकारलं" दरम्यान, पुष्पा 2 मध्ये रश्मिका मंदान्ना, फहाद फासिल, जगपती बाबू, सुनील आणि राव रमेश अशी स्टारकास्ट आहे.
























