Hinjawadi Fire Accident News: हिंजवडीत टेम्पो जळून खाक; चौघांचा होरपळून मृत्यू, अनेक जण जखमी
Hinjawadi Fire Accident News: हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले.

पुणे: पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पो ट्रॅव्हलमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चौघे ही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्सच्या आग - मृतक आणि जखमींची नावं
-सुभाष भोसले, वय 42
-शंकर शिंदे, वय 60
-गुरुदास लोकरे, वय 40
-राजू चव्हाण, वय 40, हे सर्व मृत राहणार पुणे येथील आहेत.
जखमी
-प्रदीप राऊत
-प्रवीण निकम
-चंद्रकांत मलजीत
-संदीप शिंदे
-विश्वनाथ झोरी
-जनार्दन हंबारिडकर - टेम्पो चालक
बातमी अपडेट होत आहे...






















