Chhaava Box Office Collection Day 33: 500 कोटींचा टप्पा गाठणाऱ्या 'छावा'ची कमाई घटली; बॉक्स ऑफिसवर आपटला? किती कोटींचं कलेक्शन?
Chhaava Box Office Collection Day 33: 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. मात्र, आता चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट होताना दिसत आहे.

Chhaava Box Office Collection Day 33: विक्की कौशलच्या (Vikcy Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटानं 500 कोटींपेक्षा जास्त कमाई करून अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटानं भरपूर कमाई केली. या चित्रपटात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत होती. तर अक्षय खन्ना (Akshaye Khanna) औरंगजेबाच्या भूमिकेत होता. आता चित्रपटाच्या कमाईत घट दिसून येत आहे. पाचव्या मंगळवारीही चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली.
पाचव्या मंगळवारी 'छावा'नं किती कमावले?
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, पाचव्या मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत चित्रपटानं 2.02 कोटींची कमाई केली. चित्रपटाच्या 33 व्या दिवसाच्या कलेक्शनचे अधिकृत आकडे अद्याप समोर आलेले नाहीत. पण जर चित्रपटानं दोन-अडीच कोटींची कमाई केली, तर चित्रपटाचं एकूण कलेक्शन 568 कोटी होईल.
View this post on Instagram
'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
'छावा'बद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटानं पहिल्या दिवशी 31 कोटींची कमाई केली. त्यानंतर चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 37 कोटी रुपये कमावले. पहिल्या आठवड्यात चित्रपटानं 219.25 कोटी कमावले. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 180.25 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या आठवड्यात 'छावा'नं 84.05 कोटी रुपये कमावले. या चित्रपटानं चौथ्या आठवड्यात 55.95 कोटींची कमाई केली. चित्रपटानं 29व्या दिवशी 7.25 कोटी, 30व्या दिवशी 7.9 कोटी, 31व्या दिवशी 8 कोटी आणि 32व्या दिवशी 2.65 कोटींची कमाई केली.
विक्की कौशलचा धमाकेदार चित्रपट 'छावा' अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. फिल्ममध्ये दाखवण्यात आल्यानुसार, औरंगजेबानं छत्रपती संभाजी राजांना हालहाल करून मारलं. हे पाहिल्यानंतर चाहते भावूक झाले. 'छावा'नंतर औंरगजेबाचा मुद्दा चर्चेत आला. सध्या राजकीय वर्तुळात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























