एक्स्प्लोर

Buldhana: गर्भवती महिलेच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ; बुलढाण्यात अतिशय दुर्मिळ घटना समोर

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना समोर आली आहे.

Buldhana बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना काल (28 जानेवारी) समोर आली आहे. एका गर्भवती महिलेच्या (Buldhana Pregnant Women) पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याची अतिशय दुर्मिळ घटना समोर आली. जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आतापर्यंत 200 तर देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. 

बुलढाणामधील जिल्हा महिला रुग्णालयात काल (28 जानेवारी)दुपारी एक 32 वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली. ही महिला 32 आठवड्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात ही महिला सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर त्यांना धक्काच बसला. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की, महिलेच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाच्या पोटातही एक दुसरे बाळ आहे. डॉक्टरांना विश्वासच बसेना म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलवून पुन्हा तपासणी करून निश्चित केलं.

बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर-

महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आल्याने या परिस्थितीला " फिटस इन फिटो " असं वैद्यकीय भाषेत म्हटले जाते हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त 200 तर आपल्या देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे...

नेमकं ही दुर्मिळ घटना काय?

गर्भवती महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटातही एक बाळासारखाच गोळा दिसतो याला "फिटस इन फेटो" असं म्हटल्या जातं. "काँनजेनाईटल एबनॉर्मलिटी" मुळे ही अशी परिस्थिती उद्भवते. जवळपास 5 लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये एक , तर 20 लाख गरोदर महीलांमध्ये एखाद्या महिलेत अशी परिस्थिती दिसून येते. अशा वेळेस प्रसूतीनंतर ज्यावेळी बाळाला बाळाच्या पोटातील बाळाचा त्रास होतो. त्यावेळी शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या पोटातील बाळ काढून घेतल्या जातं. बुलढाणा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना समोर आली आहे. दरम्यान, बुलढाण्यात या महिलेची प्रसूती झाल्यानंतर होणाऱ्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा नसल्याने या महिलेला छत्रपती संभाजी नगर येथील सर्व सुविधायुक्त अशा रुग्णालयात पाठविण्यात आल आहे.

संबंधित बातमी:

Kumbhmela 2025: कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी; मध्यरात्री 1 वाजता प्रयागराजमध्ये काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोचे ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोचे ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Prayagraj Maha Kumbh Sangam Stampede : महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
Mahakumbh Stampede : मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines at 8AM 29 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMahakumbh Stampede : 'कुंभ'ला लष्कराकडे सोपवावं, प्रशासकीय बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines at 7AM 29 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, शेकडो जखमी, निरंजनी अखाड्याचे संत रडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोचे ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोचे ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Prayagraj Maha Kumbh Sangam Stampede : महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
Mahakumbh Stampede : मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Maha Kumbh Stampede News : हा दु:खाचा दिवस, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योतींची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाल्या...   
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, साध्वी निरंजन ज्योती सरकारकडे मोठी मागणी करत म्हणाल्या, हा दु:खाचा दिवस...
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget