Supriya sule: संतोष देशमुखांना मारहाण होताना 'ते' फोनवरुन गंमत बघत होते, केंद्राला तीन पत्रं पाठवली; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
Supriya Sule in Pune: बरं झालं पक्ष फुटला, स्वत:च्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करु शकले नसते; सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल

पुणे: बीड जिल्ह्यात आवादा कंपनीकडून खंडणी मागणारा आणि संतोष देशमुख यांची हत्या घडवून आणणारा 'आकाचा आका' तो एकच व्यक्ती आहे. ही व्यक्ती संतोष देशमुख यांची हत्या होत असताना फोनवरुन विकृतपणे या सगळ्याची मजा घेत होती, असा गौप्यस्फोट शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रविवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांची या बैठकीतील ऑफ द रेकॉर्ड भाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, मला मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यानुसार मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना तिकडे एका व्यक्तीने फोन केला होता. ही व्यक्ती त्यांची गम्मत बघत होते. किती ही विकृती? हे वास्तव आहे. ही व्यक्ती खंडणी, सत्ता आणि पैशांच्या जीवावर हे सगळे करत होती. एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्र पाठवली होती. आवादा कंपनी वाईट आहे, त्यांच्याकडे चांगले काम होत नाही, त्यांना बीडमधून काढून टाका, अशी मागणी या व्यक्तीने केंद्राला पाठवलेल्या पत्रात केली होती. खंडणी मागणारा तोच, आवादाला हद्दपार करण्यासाठी पत्र लिहणारा तोच आणि संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असणारा 'आकाचा आका'ही तोच. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर आल्या आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
संतोष देशमुख यांच्याप्रमाणे महादेव मुंडेची परिस्थिती झाली. कोणीतरी या सगळ्याविरोधात लढले पाहिजे. लोकांच्या विरोधी पक्षाकडून खूप अपेक्षा आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या काही दिवसांत सत्ताधाऱ्यांची कामगिरी चांगली आहे की मविआची कामगिरी चांगली आहे, हे बघा. शंभर दिवसांच्या आत एक विकेट गेले, आता पुढे बघा काय-काय होतं? जे डबल डेंजर आहेत, त्यांची विकेट आपण काढायची. महिला आणि शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांची विकेट आपण काढायची. एक नेता सगळीकडे आपल्या बायकोला पुढे करतो आणि स्वत: पुढे येत नाही. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. हिम्मत असेल, तर समोर येऊन लढ. ही लढाई खूप मोठी आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
आणखी वाचा























