Woman Got Pregnant With Her Son In Law : वयाच्या 52 व्या वर्षी सासूने दिला जावयाच्या बाळाला जन्म, कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना!
Woman Got Pregnant With Her Son In Law : सासूने दिला जावयाच्या बाळाला जन्म, कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना!

Woman Got Pregnant With Her Son In Law : प्रेम आणि त्यागाची जगाच्या इतिहासात अनेक उदाहरण आहेत. मात्र, सध्या एक अनोखी घटना जगभरात चर्चेचा विषय बनलीये. त्यामुळे जगभरातील लोक हैराण झालेले पाहायला मिळत आहेत. अमेरिकेच्या नागरिक असणाऱ्या क्रिस्टी श्मिट यांच्या आयुष्यात सर्वात मोठं वळण आलंय. क्रिस्टी श्मिट यांनी वयाच्या 52 व्या वर्षी समजलं की त्या त्यांच्या पोटी जावयाचं मुलं वाढत आहे. संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊयात...
आईने आपल्या मुलीसाठी केलेल्या त्यागाची ही गोष्ट आहे. आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या आईनं हे पाऊल उचललंय. मीडिया रिपोर्ट्नुसार, क्रिस्टी श्मिट यांची मुलगी आणि जावयाला मुल होत नव्हतं. त्यांना आपल्यालाही बाळ व्हावं, अशी इच्छा होती. मात्र, अनेक प्रयत्न केल्यानंतरही आणि वैद्यकीय उपचार घेतल्यानंतरही त्यांना यश मिळत नव्हतं. त्यानंतर क्रिस्टी श्मिट यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांचासाठी सोपा देखील नव्हता. मात्र, आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या आनंदासाठी त्यांनी वैद्यकीय चाचणी करुन घेतली आणि डॉक्टरांनी देखील ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर डॉक्टरांनी वैद्यकीय प्रक्रिया करत भ्रूण प्रत्यारोपण केले. दरम्यान, आता 9 महिन्यांनंतर त्यांनी जावई आणि मुलीच्या बाळाला जन्म दिलाय.
क्रिस्टी यांच्या मुलीला आपणही बाळाची आई व्हावं असं वाटत होतं. क्रिस्टी यांच्या मुलीच्या म्हणजेच हेईडीचा जॉनसोबत 2015 साली विवाह झाला होता. मात्र, अनेक वर्षांनंतर देखील तिला बाळ होत नव्हतं. त्यामुळे तिच्या पदरी निराशा पडली होती. अखेर 2020 साली हेईडीला पहिल्यांदा प्रेग्नंट झाल होती. मात्र, तिचा हा आनंद जास्त काळ टिकला नव्हता. कारण तिला गर्भाशयाच्या डिडेल्फीस नावाची दुर्मिळ समस्या होती. अशा अवस्थेत स्त्रीला जुळं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे हेईडी जुळ्या मुलांची आई होणार होती. परंतु तिच्या दोन्ही मुलांनी जीव गमवावा. त्यामुळे हेईडीच्या आयुष्यात दुख;चा डोंगर कोसळला. डॉक्टरांनी असंही सांगितलं की, जर तुम्ही पुन्हा प्रेग्नंट झालात तर अंत्यत धोकादायक ठरु शकतं.
क्रिस्टी श्मिट यांना आपल्या मुलीला असं कायम दु:खात पाहणे सहन झाले नाही. दरम्यानच्या काळात हेईडीने आपल्या आईला IVF म्हणजेच सरोगसीबाबत सांगितलं. आपल्या मुलीची समस्या विचारात घेऊन क्रिस्टी श्मिट यांनी आपल्या जावयाचं मुलं जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. तसं पाहिलं तर, हा निर्णय घेऊन क्रिस्टी आपल्या जावयाच्या मुलाला जन्म देणार होती आणि एकाच वेळी आई आणि आजी होणार होती. क्रिस्टीने आपल्या मुलीला समजावून सांगितले की मी पूर्णपणे निरोगी आहे आणि या जबाबदारीसाठी तयार आहे. त्यानंतर वैद्यकीय प्रक्रिया सुरु झाली आणि क्रिस्टीने मुलीला शब्द दिला की, 9 महिन्यांनंतर हे बाळ तुला सोपवेन आणि तसंच झालं. वयाच्या 52 वर्षी क्रिस्टी पुन्हा एकदा आई झाली.
दरम्यान, नव्या बाळाच्या आगमनानंतर संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. संपूर्ण कुटुंब भावूक झालेलंही पाहायला मिळालं. क्रिस्टी श्मिटला तिच्या मुलासाठी काहीतरी करुन दाखवायचं होतं आणि तिने करुन दाखवलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

