Beed Accident News: पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत, बीड- परळी महामार्गावर भीषण अपघात, पंकजा मुंडे म्हणाल्या...
Pankaja Munde on Beed Accident: पोलीस भरती करणाऱ्या 3 तरुणांच्या अपघातामुळे कुटूंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेवरती बीड जिल्ह्याच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे.
Beed Accident: बीड-परळी मार्गावरती एका भीषण अपघातामध्ये (Accident) तीन तरूणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांना पहाटे व्यायाम करण्यासाठी गेले असता आज सकाळी (19 जानेवारी) भरधाव एसटी बसने चिरडलं (Accident). या घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे तिनही तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते. या घटनेने परिसरात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. सुबोध बाबासाहेब मोरे (वय 20) , विराट बब्रूवान घोडके (वय 19) आणि ओम सुग्रीव घोडके (वय 20) या तीन तरूणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस भरती करणाऱ्या 3 तरुणांच्या अपघातामुळे कुटूंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेवरती बीड जिल्ह्याच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंकजा मुंडेंनी व्यक्त केला शोक
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्स अकाऊंटवरती पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. "एका दुर्दैवी घटनेमुळे त्यांचं पोलीस व्हायचं स्वप्नं अधुरंच राहिलं..! अतिशय वेदनादायक घटना.. बीड जवळील घोडका राजुरी येथील पोलिस भरती चा सराव करताना 5 जणांना एसटी बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामधील सुबोध बाबासाहेब मोरे (वय 20) , विराट बब्रूवान घोडके (वय 19) आणि ओम सुग्रीव घोडके (वय 20) हे तीन युवक होतकरू आणि सर्वसामान्य कुटुंबांतील होते. या युवकांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना", अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
एका दुर्दैवी घटनेमुळे त्यांचं पोलीस व्हायचं स्वप्नं अधुरंच राहिलं..!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 19, 2025
अतिशय वेदनादायक घटना..
बीड जवळील घोडका राजुरी येथील पोलिस भरती चा सराव करताना 5 जणांना एसटी बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
यामधील सुबोध…
नेमका कसा घडला अपघात?
बीड-परळी महामार्गावरती आज (रविवारी) सकाळच्या सुमारास एसटी बसने व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना उडवलं. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या या 3 तरुणांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तरुण नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करण्यासाठी जात होते. यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने तरुणांना जोरदार धडक दिली. घोडका राजुरी जवळ हा अपङात झाला.
घटनेची माहिती मिळताच तरुणांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे. परळी महामार्गावर झालेल्या अपघातात बस सिमेंटच्या रस्त्यावरून खाली घसरली असून बसचा मागच्या काचा फुटल्या आहेत. या बसमध्ये प्रवासी होते का याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून नेमका कशाने अपघात झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.