New Car buying Tips: नवीन कार खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
New Car buying Tips: दिवाळीत वाहन बाजार जोरात आहे. अनेक लोक दिवाळीनिमित्त नवीन वाहनांची खरेदी करतात. जर तुम्हीही या दिवाळीत तुमच्या घरी नवीन कार घेऊन जाण्याचा निर्णय घेतला असेल किंवा गाडीची डिलिव्हरी घेणार असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
New Car buying Tips: कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर आज देशभरात निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. दोन वर्ष दिवाळी निर्बंधनात साजरी केल्यानंतर यंदा देशभरात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात लोक हा सण अगदीत उत्साहात साजरा करत आहेत. अशातच दिवाळीत वाहन बाजारही जोरात आहे. अनेक लोक दिवाळीनिमित्त नवीन वाहनांची खरेदी करतात. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी बरेच लोक लक्ष्मीपूजन हा दिवस शुभ मानतात. या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होते. जर तुम्हीही या दिवाळीत तुमच्या घरी नवीन कार घेऊन जाण्याचा निर्णय घेतला असेल किंवा गाडीची डिलिव्हरी घेणार असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
नवीन कार घेताना बरीच कागदपत्रे लागतात. यामध्ये तुम्हाला नवीन वाहनाची नोंदणी, वाहनाची तात्पुरती नोंदणी, तुम्ही कार खरेदी करण्यासाठी केलेल्या पेमेंटचे बिल, कार हस्तांतरित पावती अशा अनेक कागदपत्रांमधून जावे लागते. दस्तऐवज प्रक्रियेतून जाताना तुम्हाला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे की, तुम्ही जे काही तपशील देत आहात ते पूर्णपणे बरोबर आहे. त्यात कोणतीही चूक नसावी. जेणेकरून नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.
डेंट पेंट स्क्रॅच चेक करा
जेव्हा तुम्ही नवीन वाहनाची डिलिव्हरी घेण्यासाठी जाणार, तेव्हा त्याच्या बाहेरील भागाकडे नीट लक्ष द्या. कधीकधी काही कारणास्तव कारची डिलिव्हरी घेतल्यानंतर कारमध्ये स्क्रॅच किंवा डेंट्ससारख्या गोष्टी दिसतात. त्यामुळे या गोष्टी अगोदरच तपासून घ्याव्यात. जेणेकरून पुढे होणारा त्रास टाळता येईल.
कार इंटीरियर चेक करा
नवीन कारची डिलिव्हरी घेताना, तुम्ही कारचे आतील भाग नाव पाहणे आणि स्टीयरिंग व्हीलमधील सर्व फीचर्स पाहणे देखील खूप महत्वाचे आहे. कुठेही काही अडचण दिसत नाही, याची खात्री करून घ्या. डिलिव्हरी घेतल्यानंतर तुम्हाला काही अडचण आल्यास, तुम्हाला पुन्हा पुन्हा एजन्सीमध्ये गाडी चेक करून घेण्यासाठी वेळ वाया घालवावा लागेल. त्यामुळे अगोदर तपासणे चांगले.
अॅक्सेसरीज देखील पाहा
टूलकिट आणि प्रथमोपचार यासारख्या आवश्यक उपकरणे नवीन वाहनासह अनिवार्यपणे उपलब्ध आहेत. या अॅक्सेसरीज वाहनात आहेत की, नाही हेही तपासले पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या: