एक्स्प्लोर

Best Range Electric Scooters : सर्वाधिक रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात आहात? मग, 'या' मॉडेल्सचा नक्की विचार करा

Long Range Electric Scooters : जर तुम्हीही लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल तर आम्ही तुम्हाला अशा तीन स्कूटरबद्दल सांगणार आहोत जे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतात.

Long Range Electric Scooters : देशात इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooters) संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर दिसायला आकर्षक असतातच पण किंमतीने देखील किफायतशीर असतात. तसेच, सर्वात महत्वाचं म्हणजे इंधनाचा खर्च वाचतो. त्यामुळे ग्राहकांचा कल या स्कूटरकडे वाढत चालला आहे. मात्र, जर तुम्ही लांब रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही इलेक्ट्रिक स्कूटर्सची माहिती देणार आहोत ज्या तुम्ही खरेदी करू शकता. 

ओला S1 (Ola S1) :

ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर उत्तम पॉवर, उत्तम फिचर्स आणि लांब रेंजसह येते. ही स्कूटर 3 मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 79,999 ते 1.40 लाख रुपये आहे. S1 प्रकारात 4kwH क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे, जो 8500W IPM इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेला आहे. या स्कूटरच्या टॉप मॉडेलला 181 किलोमीटरची रेंज मिळते, तर त्याच्या खालच्या प्रकारात 101 किलोमीटरची रेंज मिळते. त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. 

Ather 450X :

Ather 450X इलेक्ट्रिक दोन मॉडेलमध्ये बाजारात उपलब्ध आहे. स्कूटरला 3.7 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो, जो 6200 W च्या शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेला आहे. स्लीक डिझाईन आणि लांब पल्ल्याची स्कूटर अतिशय आकर्षक दिसते. ही स्कूटर साडेचार तासांत पूर्ण चार्ज होते. या स्कूटरची रेंज 146 किमी आहे, आणि ती ताशी 80 किमी वेगाने धावू शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर दिल्लीच्या एक्स-शोरूमनुसार 1.17 लाख ते 1.39 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. जास्त रेंज देणारी ही बाईक देखील तुम्ही खरेदी करू शकता. 

Simple One : 

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल बॅटरी पॅक आणि डबल बॅटरी पॅक अशा दोन प्रकारांमध्ये बाजारात येते. ही इलेक्ट्रिक स्कूटर 236 किमीच्या सर्वोच्च श्रेणीसह येते. या स्कूटरला 8500 W ची पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर मिळते, जी 4.8 kWh क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरी पॅकसह जोडलेली आहे. ही स्कूटर जास्तीत जास्त 105 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.10 लाख रुपये आहे, तर त्याचे टॉप मॉडेल 1.45 लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Affordable Sports Bikes : दिवाळीत कमी बजेटमध्ये स्पोर्ट्स बाईक खरेदी करायचीय? तर 'या' मॉडेल्सचा विचार करू शकता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget