लटकणारी जाळी ट्रकला अडकली, चालकाच्या सतर्कतेमुळं मोठा अनर्थ टळला, मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील हलगर्जीपणा समोर
मुंबई गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) कामातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway)कामातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. चिपळूण शहरातील उड्डाण पुलाचे काम करताना रस्त्यावर लटकणारी जाळी मार्गावरुन जाणाऱ्या ट्रकला अडकल्याची घटना घडली आहे. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला आहे. घटनेच्या वेळी ब्रीजवर तीन ते चार कर्मचारी काम करत होते. वेळीच ट्रक थांबवल्यामुळं मोटा अपघात टळला आहे. ब्रीज दुर्घटने नंतरही महामार्गाचे काम करणाऱ्या कंपन्यांकडून सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा केला जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. या कामात सुरु असलेला हलगर्जीपणा समोर आला आहे. काम करताना लावलेली जाळी एका ट्रकला अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळं मोठा अपघात टळला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर दोन कार समोरासमोर धडकल्या
मुंबई गोवा महामार्गावरील लवेल येथे दोन कारमध्ये जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे. धडकेत एक कार रस्त्यावर पलटी झाली, तर दुसरी कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्यावर आपटल्याचं पाहायला मिळालं. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

