कधी होणार मुंबई महानगर पालिकेची निवडणूक? अधिकारी आणि राज्य निवडणुक आयोगाची बैठक, महत्वाची माहिती समोर
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका (Mumbai Municipal Corporation Election) निवडणुका कधी होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबाबत मुंबई महानगर पालिकेतील सूत्रांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Mumbai Municipal Corporation Election : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका (Mumbai Municipal Corporation Election) ऑक्टोबरनंतरच होणार आहेत. मुंबई महानगर पालिकेतील सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणुक आयोगाची नुकतीच बैठक पार पडली आहे. यावेळी निवडणुकी संदर्भात चर्चा झाली आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच लागणार असल्याची माहिती आहे.
निवडणुकासंदर्भात पुढील सुनावणी ही 4 मे रोजी होणार
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकासंदर्भात पुढील सुनावणी ही 4 मे रोजी होणार आहे. मे महिन्यात निकाल लागला तरी देखील महानगर पालिकेच्या निवडणुका पावसाळ्याअगोदर होणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार निकाल लागल्यानंतर जवळपास 100 दिवस प्रशासकांना निवडणुकीची तयारी करायला वेळ लागणार आहे. यामध्ये वॉर्ड रचना, यादी तपासणी, हरकती मागवने, आरक्षण सोडत या बाबींचा समावेश असणार आहे.
महापालिका निवडणुका कधी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष
राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण पुढील सहा ते सात महिने महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नसल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवरसर्वच पक्षांनी जोरदार तयारीला देखील सुरुवात केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी यावेळी मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटानं देखील पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार याबाबत चर्चा सुरु आहे. कारण हा माहापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांदणीला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. तर महायुती महापालिकेच्या निवडणुका एकत्रच लढणार असल्याचं सागण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवरक शिवसेना ठाकरे गटाचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं यावेळी भाजपनं नियोजन करत महापालिकेची सत्ता खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

