Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात श्राद्ध करायचंय, पण पैशांची आणि वेळेची कमतरता? 'अशा' पद्धतीने करा श्राद्ध
Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात पितरांच्या शांतीसाठी पिंडदान आणि श्राद्ध केले जाते. पण पैसा आणि वेळ या दोन्हींची कमतरता असताना अशा परिस्थितीत काय करावे? जाणून घ्या
Pitru Paksha 2023 : श्राद्ध पक्ष किंवा पितृ पक्ष 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, श्राद्धाच्या 16 दिवसांमध्ये आपले पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतात. या दिवसांमध्ये पिंडदान आणि तिलांजली अर्पण करून पितरांना संतुष्ट केले जाते. परंतु ज्यांच्याकडे पैसे किंवा वेळेची कमतरता आहे, अशा लोकांनाही श्राद्ध करणे अनिवार्य आहे, कारण पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी आपण श्राद्ध केले नाही तर ते आपल्यावर रागावतात आणि निघून जातात. अशी धारणा आहे, मग अशावेळी काय करायचं? जाणून घ्या
शास्त्रानुसार काही उपाय सांगितले आहेत, जाणून घ्या
पैशाची कमतरता असल्यास श्राद्ध याप्रमाणे करता येते:
अन्न खरेदी करण्यासाठी पैशाची कमतरता असल्यास, अशा स्थितीत श्राद्ध फळे आणि भाज्यांनी करावे. जर आर्थिक स्थिती कोणत्याही प्रकारे मजबूत नसेल तर अशा स्थितीत गवताने श्राद्ध करता येते असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणजे गवत कापून गाईला खाऊ घाला. तरीही श्राद्ध केल्यासारखे पुण्य फळ मिळते. त्यामुळे गरज आहे ती श्रद्धा आणि भावनांची.
वेळ कमी असल्यास श्राद्ध कसे करावे :
जर तुमच्याकडे वेळ नसेल तर शुद्ध भावनेने पितरांचे स्मरण करा आणि गाईला घास खाऊ घाला. श्राद्ध पूर्ण विधींनी केले पाहिजे, परंतु जर तुम्हाला वेळ आणि पैशामुळे श्राद्ध करता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करावे. सूर्यास्ताच्या वेळी ज्या ठिकाणी पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी ठेवले आहे, त्या ठिकाणी भक्तीभावाने तुपाचा दिवा लावा आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना वंदन करा. म्हणूनच भक्तीभावाने केलेले कार्य म्हणजे श्राद्ध असे म्हणतात.
पितृपक्षात श्रीमद् भागवत गीतेचे पठण करा
पितृपक्षात श्रीमद भागवत गीतेचे पठण केल्याने पितरांचा मोक्ष मिळतो. पितृदोष आणि पितृशांतीपासून मुक्ती मिळते. शास्त्रात पितरांच्या कल्याणाचा सोपा उपाय सांगितला आहे. माणूस जन्माला येताच त्याच्यावर देव, गुरू आणि पितृ ऋण असतात. गुरूंनी दाखविलेल्या मार्गाने गुरूच्या ऋणातून मुक्ती मिळते, देवांची पूजा करून पितृ ऋण तसेच पितरांचे तर्पण श्राद्ध, पिंडदान केल्याने पितृऋणपासून मुक्ती मिळते. गीतेचे ज्ञान जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रात दिले. या गीतेचा ७ वा अध्याय पितरांच्या मुक्ती आणि मोक्षाशी संबंधित आहे. गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण श्राद्ध पक्षात करावे. श्राद्धाच्या वेळी या अध्यायाचे जास्तीत जास्त पठण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे पितरांना समाधान मिळेल आणि पितृदोषापासून मुक्ती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Pitru Paksha 2023 : पितृपक्षात दाढी, मिशा, नखं आणि केस कापावेत की नाही? शास्त्रानुसार काय आहेत नियम? जाणून घ्या