एक्स्प्लोर
अवघा रंग एक झाला... कार्तिकीनिमित्त पंढरीत माऊलींच्या राऊळीला फुलांचा बहर, शासकीय महापूजाही संपन्न
Prabodhini Ekadashi 2024: आज कार्तिकी एकादशी... लाडक्या विठु माऊलीच्या दर्शनासाठी पंढरीत वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.

Prabodhini Ekadashi 2024
1/10

आज कार्तिकीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पार पडते. पण, यंदा निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
2/10

आचारसंहितेमुळे यंदा विठुरायाची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या हस्ते होत आहे.
3/10

विठ्ठलाच्या महापूजेत लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई सगर मानाचे वारकरी ठरले.
4/10

या महापूजेसाठी मानाचे वारकरी ठरलेले सगर कुटुंबीय हे गेली 14 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत. गवंडीकाम करून ते आपला चरितार्थ चालवतात.
5/10

कार्तिकी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजविण्यात आले होतं.
6/10

पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांनी विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
7/10

आपल्या लाडक्या माऊलीचं गोजिरं साजिरं रूप डोळ्यांत साठवण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे.
8/10

आज होत असलेल्या कार्तिकी सोहळ्यासाठी सहा लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
9/10

संपूर्ण पंढरी नागरी विठुनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे.
10/10

अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे.
Published at : 12 Nov 2024 07:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
