एक्स्प्लोर

Important Days in May : मे महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

Important Days in May : मे महिना अवघ्या काही दिवसांवर आहे. दोन दिवसांवर असणाऱ्या मे महिन्याचे जाणून घ्या दिनविशेष.

Important Days in May 2022 : अवघ्या दोन दिवसांवर मे महिना येऊन ठेपला आहे. अशातच, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मार्च महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचे दिवस साजरे केले जातात. तसेच प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे? चला जाणून घेऊयात. 

1 मे - महाराष्ट्र दिन (Maharashtra Day)

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.    महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

1 मे - जागतिक कामगार दिन (World Labour Day)

जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1886 साली सुरुवात झाली. कोणत्याही समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. कामगारांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून जगभर 1 मे या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो. जगभरातील 80हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो.

2 मे - जागतिक हास्य दिन 

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात मुंबईमधूनच झाली होती. हा दिवस सर्वात आधी 10 मे 1998 या दिवशी डॉ. मदन कटारिया यांनी साजरा केला होता. आज दिवसभरामध्ये जवळपास 100 देशांमध्ये मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे, लोकांना हसण्याचं महत्त्व आणि फायदे याबाबत जागरूक करणे हाच आहे. 

3 मे - अक्षय्य तृतीया 

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया ही हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया म्हणून साजरी केली जाते आणि हा दिवस खास साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणून पाळला जातो. यावेळी 3 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी केलेली सोने-चांदीची खरेदी अनेक पटीने लाभदायक ठरते.

3 मे - रमजान ईद 

रमजान ईद हा मुस्लिम धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे. याला ईद उल्-सगीर असेही म्हटले जाते. हिजरी कालगणनेनुसार नवव्या रमजान महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास केले जातात, ज्यांना रोजे पाळणे असे म्हणतात. रमजानचा पवित्र व शुभ महिना संपल्यावर चंद्रदर्शन होताच शव्वाल ह्या दहाव्या महिन्याचा प्रारंभ होतो. या दिवशी उपवासाचे पारणे फेडले जाते. या दिवसाला ईद अल्-फित्र असे म्हणतात. 

3 मे बसवेश्वर जयंती  

लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा म्हणजेच बसवेश्वर यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यांचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात. 

3 मे परशुराम जयंती   

हिंदू कॅलेंडरनुसार,परशुराम जयंती वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वीवरील अन्यायाचा नाश करण्यासाठी परशुराम म्हणून जन्म घेतला. वैशाख शुक्ल पक्षाची तृतीया अक्षय्य तृतीयेसह, भगवान परशुरामांची जयंती साजरी केली जाते. धर्मग्रंथानुसार भगवान परशुरामांचा जन्म प्रदोष काळात वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला झाला होता. भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे सहावे रूप मानले जाते. पुराणानुसार महर्षि जमदग्नींनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्यानंतर देवराज इंद्राला प्रसन्न करून पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले, वैशाख शुक्ल तृतीयेला महर्षींची पत्नी रेणुका हिने परशुरामाला जन्म दिला. यावर्षी परशुराम जयंती 3 मे रोजी साजरी होणार आहे.

3 मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन

'जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन (World Press Freedom Day) दरवर्षी 3 मे रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत 1993 मध्ये जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची स्थापना करण्यात आली होती

4 मे - आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस (International Firefighter’s Day)

आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस (IFFD) दर वर्षी 4 मे रोजी साजरा केला जातो. पहिल्यांदा 1999 मध्ये हा दिवस साजरा केला गेला होता. याचा मुख्य उद्दिष्ट फायर फायर्ट्सचा सन्मान आणि त्यांचा आभार मानणे आहे जी आपले प्राण पणाला लावून वन्यजीवांचे प्राण वाचवितात. या साहसी कामामध्ये बरेच सैनिकही मरण पावले आहेत.

8 मे - जागतिक मातृदिन. (Mother's Day)

9 मे 1914 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा संमत करून घेतला. या कायद्यानुसार, मे महिन्याचा दुसरा रविवार 'मदर्स डे' म्हणून साजरा करण्यात येतो आहे. तेव्हापासून बहुतांश देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतामध्येही मदर्स डे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी आईला कामात मदत करून, तिला वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन खुश केले जाते. 

9 मे -  रवींद्रनाथ टागोर जयंती

रवींद्रनाथ टागोर हे जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक होते. ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते. हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य आणि संगीतात आमूलाग्र बदल घडून आला.  रवीन्द्रनाथांनी रचलेल्या 'जन गण मन' आणि 'आमार शोनार बांग्ला' ह्या रचना अनुक्रमे भारत आणि बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या.

11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस  (National Technology Day (India)

1998 साली आजच्याच दिवशी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दिसून आली. पोखरण अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. अणुचाचणी तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रतीक म्हणून दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ साजरा केला जातो. 11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-I या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. 

12 मे - जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day)

रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून साजरा केला जातो. 1971 मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला, तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून संपूर्ण जगात 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

16 मे - बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima)

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण आणि उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे 180 देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. 

18 मे - जागतिक संग्रहालय दिन (International Museum Day)

जगभरात 18 मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1977 सालापासून जगभरात हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय कौन्सिल यांच्यामार्फत जगभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन जागतिक संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने केले जाते.

31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन (Anti-Tobacco Day)

हा दिवस 31 मे रोजी पाळण्याचा उद्देश हा की जगभर हानिकारक तंबाखूचे दुष्परिणाम पोहोचावेत आणि लोकांनी हे व्यसन सोडावे. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आणि चर्चेअंती त्यांनी 1987 साली यावर अंतिम ठराव संमत केला. जागतिक आरोग्य संघटनेने 1988 सालापासून दरवर्षी 7 एप्रिल रोजी 'वर्ल्ड नो टोबॅको डे' पाळला जाईल अशी घोषणा केली, या तारखेला जागतिक आरोग्य संघटनेला 40 वर्षे पूर्ण होत होती म्हणून हा दिवस ठरविण्यात आला. परंतु, काही कारणास्तव हा दिवस बदलण्यात आला आणि 31 मे हा दिन निश्चित करण्यात आला. म्हणून 1988 सालापासून दर 31 मे रोजी 'वर्ल्ड नो टोबॅको डे' पाळण्यात येतो.

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget