एक्स्प्लोर

Nagpur Violence: नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन, 80 जणांना अटक; शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी

Nagpur Violence Updates: नागपूरच्या महल परिसरात सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये हिंसाचार झाला होता. यावेळी प्रचंड दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून (Nagpur Police) रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री हिंसा उसळल्यानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. त्यानंतर दोन गटांकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. सध्या नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले असून महाल परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. काल रात्रभर पोलिसांचे अटकसत्र सुरु होते. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि 55 व्हिडीओ पोलिसांच्या रडारवर आहेत.

नागपूरच्या महाल परिसरानंतर हंसपुरी भागातही तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे. या भागात 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र, पोलिसांनी येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी सकाळी 10 वाजता नागपूर येथे येत असून, ते महाल भागातील पाहणी करणार आहेत. प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद करतील. मीडियाशी संवाद साधतील, अशी माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार, सोमवारी नागपूरमधील गणेशपेठ आणि महाल परिसरात सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कापडातील (गवताचा पेंडा भरुन) प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. संध्याकाळी 7.30 वाजता गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथे 80 ते 100 लोकांनी जमून पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा हात जायबंदी झाली आहे.

नागपूरमधील कोणत्या भागांमध्ये संचारबंदी?

गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपीलनगर या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याठिकाणी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणासाठी कोणीही घराबाहेर पडणार नाही. तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. 

आणखी वाचा

नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur : जबरदस्तीने सिगारेटचे बिल भरायला सांगितले, नकार देताच टोळक्याचा तरुणांवर जीवघेणा हल्ला, नागपुरातील घटना
जबरदस्तीने सिगारेटचे बिल भरायला सांगितले, नकार देताच टोळक्याचा तरुणांवर जीवघेणा हल्ला, नागपुरातील घटना
Nagpur Crime News: एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
Fairness Cream Alert : सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड,
सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड
Nagpur : स्वयंपाकघरातील गॅस गळतीने आग लागली, नंतर स्फोट झाला, नागपुरात एकाचा मृत्यू, 10 जण जखमी
स्वयंपाकघरातील गॅस गळतीने आग लागली, नंतर स्फोट झाला, नागपुरात एकाचा मृत्यू, 10 जण जखमी

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Supriya Sule : वादविवादाचं टेबल राजकीय 'लेव्हल' Special Report
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : ठाकरेंच्या कोट्या, भाजपची चर्चा Special Report
Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना 2200 टक्के रिटर्न, जाणून घ्या
पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना बनवलं मालामाल
Kerala Blast : केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफ म्हणून वसूल केलेले पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु, भारताला फायदा होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफ म्हणून वसूल केलेले पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु, भारताला फायदा होणार?
Good Loan vs Bad Loan :  सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
Home Loan : 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
Embed widget