Important Days in April 2022 : एप्रिल महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
एप्रिल (April 2022) महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचे दिवस साजरे केले जातात. तसेच प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे?
Important Days in April 2022 : अवघ्या काही दिवसांवर एप्रिल महिना येऊन ठेपला आहे. अशातच, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, एप्रिल महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचे दिवस साजरे केले जातात. तसेच प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे? एप्रिल महिन्यात कोणत्या थोर व्यक्तीमत्व असलेल्या महापुरूषांची, संतांची जयंती तसेच पुण्यतिथी आहे हे देखील जाणून घेणार आहोत.
एप्रिल महिन्यातील महत्वाचे सण, उत्सवाचे दिवस तसेच जयंती आणि पुण्यतिथी (festivals, jayanti, punyatithis in april 2022)
1 एप्रिल -धर्मवीर संभाजी महाराज पुण्यतिथी तिथीनुसार
औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे 40 दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली. स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महारांजी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबवल्या.
डॉ. केशव बळीराम हेडगेवार जयंती -डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म एप्रिल 1 सन इ.स. 1889 मध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सीमेच्या बोधाण तालुक्यातील कुंदाक्रुती गावात झाला. हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले. मैट्रिक पास झाल्या नंतर, इ.स. 1910 साली चिकित्सा शिक्षण घेण्यासाठी ते कोलकत्त्याला गेले. तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी – व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच ‘वंदे मातरम्’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण जाणीवपूर्वक कोलकतामध्ये घेतले. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले.
2 एप्रिल - गुढी पाडवा-हिंदु नववर्ष
गुढी पाडवा-हिंदु नववर्ष - गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.[३] शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी - छत्रपती शिवाजीराजे भोसले (19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. 1664 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
10 एप्रिल -श्रीराम नवमी
चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे.. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी 12 वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. श्री रामांची पूजा करताना त्यानां करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात.. तसेच श्री रामांना हळद-कुंकू वाहतांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात.. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.
11 एप्रिल – (महात्मा फुले जयंती) (कस्तुरबा गांधी जयंती)
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (11 एप्रिल 1827 - 28 नोव्हेंबर 1890) हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले.
कस्तुरबा गांधी जयंती - कस्तुरबा मोहनदास गांधी (जन्म : 11 एप्रिल 1869; - 22 फेब्रुवारी 1944, पुणे) या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे. गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्याकस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय 13 वर्षे होते.
12 एप्रिल (कामदा एकादशी) (शुक्ल एकादशी)(चैत्र एकादशी)
भगवान विष्णूची पूजा कामदा एकादशीच्या दिवशी केली जाते. या दिवशी उपवास केल्याने सर्व प्रकारच्या दु: खापासून मुक्तता मिळते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णू अपूर्ण इच्छा पूर्ण करतात. म्हणून त्याला फलदा एकादशी किंवा कामदा एकादशी असेही म्हणतात.
14 एप्रिल -बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर वर्धमान जयंती, बैसाखी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो.[१] हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते.
महावीर वर्धमान जयंती : (इ.स.पू. ५९९–५२७). जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांपैकी अखेरचे तीर्थंकर. महावीरांच्या आधी जैन धर्माचे २३ तीर्थंकर होऊन गेले, असे जैन धर्माचे अनुयायी मानतात आणि त्यामुळे महावीर हे जैन धर्माचे संस्थापक ठरत नाहीत; परंतु जैन धर्माला प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय महावीरांकडे जात असल्यामुळे जगातील प्रमुख धर्मसंस्थापकांच्या मालिकेतील गौतम बुद्ध वगैरेंच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाते.
बैसाखी - १६९९ पासून हा दिवस सामान्यत: १४ एप्रिल या दिवशी साजरा होतो. इ. स. २००३ पासून शीख गुरूद्वारा प्रबंधक समितीने या दिवसाला “बैसाख” (वैशाख) असे नाव दिले असून नानकशाही कालगणनेनुसार तो वैशाख महिन्याचा पहिला दिवस म्हणून साजरा होतो.
15 एप्रिल- गुड फ्रायडे
गूड फ्रायडे (पवित्र शुक्रवार/चांगला शुक्रवार/काळा शुक्रवार/महा शुक्रवार) हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेऊन ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
16 एप्रिल – (हनुमान जयंती) (छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी)
प्रभू रामचंद्रावर (Lord Ram) निस्सीम भक्ती करणाऱ्या हनुमंताचा जन्म महोत्सव म्हणजेच हनुमान जयंती देश विदेशात दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरी केली जाते. खोडकर स्वभाव व अमाप शक्तीचे समीकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाला रामायणात व परिणामी लाखो भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त झालेलं आहे. पवनपुत्र हनुमानाला मर्कट चेहरा प्राप्त असून त्यात शंकराचा अंश असल्याचं मानलं जातं. येत्या19 एप्रिलला येऊ घातलेल्या हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निम्मिताने भारतातील वेगवेगळ्या राज्यांच्या परंपरेनुसार पार पडणाऱ्या रामभक्त हनुमानाच्या पूजा केली जाते.
17 एप्रिल -ईस्टर संडे
ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी 40 दिवसांच्या उपवासाचा हा काळ संपतो.
19 एप्रिल -अंगारक संकष्ठ चतुर्थी
चतुर्थी म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी. खरं तर, जेव्हा कृष्ण पक्षाची चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. चतुर्थी मंगळवारी पडल्यास मंगळाचा प्रभाव देखील गणेशाच्या पूजेमध्ये वाढतो. पुराणानुसार असं म्हटलं जातं की जो कोणी या दिवशी गणेशाची पूजा करतो, उपवास ठेवतो, त्याला गणेशाच्या कृपेसह शुभ फळ प्राप्त होते
21 एप्रिल -राष्ट्रीय नागरी सेवा दिवस (भारत)
21 एप्रिल 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते. त्या दिवसाची आठवण म्हणून 2006 पासून हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून नियमितपणे साजरा होत आहे.
22 एप्रिल - 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो. दरवर्षी हे साहित्य संमेलन महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत होत असते. जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य लातूर जिल्ह्यातील उद्गीर येथे पार पडणार आहे. उद्गीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिनांक 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी हे साहित्य संमेलन पार पडणार आहे.
28 एप्रिल -अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी
30 एप्रिल 1878 रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके1800, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली व नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले
30 एप्रिल (आयुष्यमान भारत दिवस)
आयुष्मान भारत दिवस भारतात दरवर्षी 30 एप्रिल रोजी साजरा केला जातो . दुहेरी ध्येय साध्य करण्यासाठी आयुष्मान भारत दिवस साजरा केला जातो. ते आहेत: गरिबांसाठी आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांना विमा लाभ प्रदान करणे. सामाजिक-आर्थिक जात जनगणना डेटाबेसच्या आधारे देशातील दुर्गम भागात परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधांना प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हे आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देईल आणि गरिबांना विम्याचे लाभ देईल.
राष्टसंत तुकडोजी महाराज जयंती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विषयी संशोधनात्मक लेखन करावे असा अनेक दिवसांचा मानस होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये अमरावती जिल्ह्यात यावली येथे झाला. पुढे त्यांनी अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात फार मोठे कार्य केले ग्रामगीतेसारखे फार मोठे साहित्य निर्माण केले. जनमानसात भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात ते प्रसिद्धीस आले. त्यांच्या या आघाध कार्यामुळे लोक त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखू लागले
एप्रिल महिन्यातील महत्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस (international day in april 2022)
1 एप्रिल (जागतिक एप्रिल फुल डे)
1 एप्रिल म्हणजे मित्रांना किंवा आपल्या जवळच्या लोकांना मूर्ख बनवण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो . कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण त्यांना मूर्ख बनवत असतो! लहान असो की मोठा सर्वच जण एकमेकांना विविध युक्त्या लढवून या दिवशी एप्रिलफुल बनवतात ! या दिवशी कोणाशीही चेष्टा मस्करी केली तरी एप्रिलफुल म्हणून ती माफ केली जाते. संपूर्ण जगभरात हा दिवस एप्रिल फुल दिवस म्हणून साजरा केला जातो.
2 एप्रिल- जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस
ही एक प्रकारची 'गुंतागुंतीची असणारी मानसिक जन्मस्थ अवस्था' असून, तो 'रोग' नाही. याचा शोध 'लिओ केनेर' यांनी सन १९४३ मध्ये लावला. 'स्वमग्नावस्थेतील व्यक्ती आपल्याच विश्वात व विचारात रममाण असतात. यांच्या संवेदनांचे अर्थ लावू शकत नाही, म्हणून त्यावर ते प्रतिक्रिया देत नाहीत. स्वमग्नता हा एक विकार जरी म्हटला तरीदेखील, हे 'लक्षण' म्हणजेच, 'पूर्ण विकार' असे देखील म्हणता येत नाही. आणि म्हणूनच, ही एक 'मानसिक गुंतागुंतीची अवस्था' आहे, असे म्हटले जाते. 'मनोविकारतज्ञ', 'बालरोगतज्ञ' यांचा सल्ला यासाठी महत्वाचा ठरतो.
आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन
आज 2 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन आहे जो 1967 पासून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस होता लेखक हंस ख्रिश्चन अँडरसन यांना श्रद्धांजली म्हणून निवडले गेले, त्याचा जन्म दिवस निवडला. अँडरसन एक डॅनिश लेखक आहे जो मुलांच्या कथांसाठी प्रसिद्ध आहे, ज्यात द अग्ली डकलिंग आणि द लिटल मर्मेड या दोन्ही कथा आहेत ज्या डिस्नेने मोठ्या पडद्यासाठी रुपांतर केल्या आहेत. मुलांच्या पुस्तकांकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी आणि मुलांच्या पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
7 एप्रिल- जागतिक आरोग्य दिन
जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले. विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.
17 एप्रिल - जागतिक हिमोफिलिया दिवस
17 एप्रिल हा जागतिक हेमोफेलिया दिन म्हणून संपूर्ण जगात पाळला जातो. हेमोफेलिया हा आनुवंशिक आजार आहे. ज्यात शरीरात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव वाढतो. एखाद्या व्यक्तीला जर हेमोफेलिया हा आजार झाला असेल तर इजा झालेल्या भागात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. त्यातून त्या भागाला सूज येते. पण, अनेकदा हा आजार दूर्लक्षित राहिल्याने किंवा या विषयी जनजागृती नसल्याने 80 टक्के लोकांना या आजाराबाबतची माहितीच नसते. तसंच राज्यातील जवळपास 3 हजारांहून अधिक रुग्ण हेमोफेलियाने ग्रस्त आहेत.
18 एप्रिल - जागतिक वारसा दिन
लिखित स्वरूपाच्या इतिहासाबरोबर वास्तुरुपी राष्ट्रवैभवाचे योग्य संवर्धन करणे हे सरकार बरोबर सुजाण नागरिकांचाही कर्तव्य आहे, याची समाज मनाला जाण देण्यासाठी युनेस्को तर्फे 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो, इतिहासाच्या पाऊल खुणांबरोबर धार्मिक अधिष्ठानासह सांस्कृतिक मोलही आहे. त्यातील काहींना राष्ट्राच्या अस्मितेची शान आहे. त्यात गडकोट, कमानी, राजवाडे, मनोरे, विजयस्तंभ प्रशासकीय इमारतींचा समावेश आहे.
10 एप्रिल - जागतिक होमिओपॅथी दिवस
दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी जागतिक होमिओपॅथी दिन पाळण्यात येतो. यावर्षी डॉक्टर हॅनिमेन यांची 264 वी जयंती साजरी केली जात आहे. या दिनानिमित्त भारतात नवी दिल्लीत केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (CCRH) यांच्यावतीने 9 एप्रिल 2019 रोजी दोन दिवस चालणारी परिषद भरविण्यात आली आहे. दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी होमिओपॅथी या वैद्यकीय उपचार पद्धतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर क्रिस्टीएन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमेन यांचा जन्मदिवस ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. सॅम्युअल हॅनिमेन यांनी 1969 साली पर्यायी औषधोपचार म्हणून होमिओपॅथी ही पद्धत विकसित केली.
19 एप्रिल -जागतिक यकृत दिवस
जागतिक यकृत दिवस देखील आहे. यकृता संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसचं त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरविण्यासाठी दरवर्षी 19 एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिवस म्हणून साजरा केला जातो.
22 एप्रिल- जागतिक (पृथ्वी) वसुंधरा दिन
वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित.. याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन साजरा केला जाऊ लागला.
23 एप्रिल - जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन
जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड बुक कॅपिटल 2020 मलेशियाची राजधानी असलेलं क्वालालंपूर आहे. युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे.
25 एप्रिल -जागतिक मलेरिया दिवस
मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. जागतिक मलेरिया दिवस (डब्ल्यूएमडी) जागतिक स्तरावर दरवर्षी 25 एप्रिल रोजी मलेरिया नियंत्रित करण्यासाठी जगभरातील लोकांच्या प्रयत्नांना मान्यता म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य असेंब्लीच्या 60 व्या सत्रामध्ये मे 2007 मध्ये हा निर्णय घेण्यात आला. जागतिक मलेरिया दिवस 2021 ची थीम ‘शून्य मलेरिया लक्ष्यापर्यंत पोहोचणे अशी आहे, मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो
27 एप्रिल- जागतिक पशुवैद्यकीय दिवस
जागतिक पशुवैद्य दिन 2021 रविवारी, 27 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. दर वर्षी एप्रिल महिन्याचा शेवटचा शनिवार हा जगभरात पशुवैद्यक दिन म्हणून साजरा केला जातो. इंग्लंडमधील प्रा. जॉन गमजी यांनी 14 ते 18 जुलै 1863 मध्ये जर्मनीमधील हॅम्बुर्ग येथे युरोपमधील पशुवैद्यकांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय पशुवैद्यक कॉंग्रेसची स्थापना झाली. या कॉंग्रेसचे पुढे जागतिक पशुवैद्यक संघटनेमध्ये रूपांतर झाले. ही संघटना जगभरातील पशुवैद्यकांचे प्रतिनिधित्व करते. जगभरातील 90 राष्ट्रीय पशुवैद्यक संघटना आणि 12 जागतिक पशुवैद्यक संघटना या संघटनेशी जोडलेल्या आहेत. या दिवशी विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून पशुवैद्यकांना विशेष गुणवत्ता पारितोषिकांने सन्मानित करण्यात येते. जनावरे ही आपल्या शेती, संस्कृती आणि आरोग्याचा आधार. पशुपालनाने खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आर्थिक ताकद दिली.
29 एप्रिल – आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
International Dance day 2021: नृत्य किंवा डान्स हा केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचाच नव्हे तर संबंधित संस्कृतीचा आत्मा असतो. नृत्यावरून त्या संस्कृतीचा अंदाज लावता येतो. नृत्य हे मानवाच्या अभिव्यक्तीचा अविष्कार आहे. आपल्या शरीराच्या माध्यमातून विविध भावना व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे. मनुष्याच्या आयुष्यात असलेल्या या नृत्याचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी दरवर्षी 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातोय.
एप्रिल महिन्यातील महत्वाचे राष्ट्रीय दिवस तसेच दिनविशेष (national day in april 2022)
1 एप्रिल (राष्ट्रीय हवाई दल दिन) (ओडिसा दिवस)
१ एप्रिल १९३३ रोजी हवाई दलाची पहिली तुकडी तयार करण्यात आली, ज्यात ६ आएएफ- प्रशिक्षित अधिकारी आणि १९ हवाई कर्मचारी होते. भारतीय हवाई दल जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांपैकी एक आहे. हवाई दलाने आपल्या शौर्याने भारताला अनेक वेळा अभिमान वाटावा असे क्षण दिले आहेत.
ओडिसा दिवस - उत्कल दिवस किंवा उत्कल दिबासा हा स्वतंत्र राज्य म्हणून ओळख मिळवण्याच्या संघर्षानंतर ओडिशा राज्याच्या निर्मितीची आठवण म्हणून दरवर्षी 1 एप्रिल रोजी साजरा केला जातो . ब्रिटीश राजवटीत, ओडिशा बंगाल प्रेसिडेन्सीचा भाग होता, ज्यामध्ये सध्याचे बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा समाविष्ट होते. राज्याचे मूळ नाव ओरिसा असे होते परंतु लोकसभेने मार्च 2011 मध्ये ओरिसा विधेयक आणि संविधान विधेयक (113 वी दुरुस्ती) मंजूर करून त्याचे नाव बदलून ओडिशा केले.
5 एप्रिल -राष्ट्रीय सागरी दिवस
भारत देशात दरवर्षी 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन (National Maritime Day) पाळला जातो. यावर्षी 'इंडियन ओशन – अॅन ओशन ऑफ ऑपर्चुनिटी' ही या दिनाची संकल्पना आहे. 'एस. एस. लॉयल्टी' या भारताच्या स्वताःच्या पहिल्या वाफेवर चालणार्या जहाजाने 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईकडून ब्रिटनकडे प्रवास सुरू करून इतिहास तयार केला होता.
11 एप्रिल- राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस
महिलांच्या मातृत्वाच्या सुरक्षेसाठी भारतात दरवर्षी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. व्हाइट रिबन अलायन्स इंडिया (WRAI) चा हा उपक्रम आहे. सुरक्षित मातृत्वासाठी, भारत सरकारने 2003 मध्ये 11 एप्रिल हा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. गर्भधारणेदरम्यान, प्रसूतीनंतर आणि प्रसूतीनंतर महिलांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा दिली जावी, जेणेकरून प्रसूतीदरम्यान किंवा बाळाला जन्म दिल्यामुळे कोणत्याही महिलेचा मृत्यू होऊ नये म्हणून ते पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळंतपणामुळे होणाऱ्या मातांच्या मृत्यूच्या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत वाईट आहे.
13 एप्रिल - जालियनवाला बाग हत्याकांड राष्ट्रीय दिन
जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी ( बैसाखी दिवस) अमृतसर , पंजाब , भारत येथे सुवर्ण मंदिराजवळ जालियनवाला बाग येथे घडले . रौलेट कायद्याचा निषेध करण्यासाठी एक सभा आयोजित केली जात होती , ज्यामध्ये जनरल डायर नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने त्या सभेत उपस्थित असलेल्या जमावावर बेछूट गोळीबार केला, 400 हून अधिक लोक ठार झाले [२] आणि 2000 हून अधिक जखमी झाले. [३] [४] अमृतसरच्या उपायुक्त कार्यालयात ४८४ शहीदांची यादी आहे, तर जालियनवाला बागेत ३८८ शहीदांची यादी आहे. या घटनेत 200 लोक जखमी झाले आणि 379 लोक मरण पावले, ज्यामध्ये 337 पुरुष, 41 अल्पवयीन मुले आणि एक 6 आठवड्याचे बाळ होते हे ब्रिटीश राजवटीच्या नोंदी मान्य करतात. अनधिकृत आकडेवारीनुसार 1000 हून अधिक लोक मारले गेले आणि 2000 हून अधिक जखमी झाले.
14 एप्रिल -(राष्ट्रीय ज्ञान दिवस) (राष्ट्रीय अग्नीशमन दिन) (तामिळ नव वर्ष)
भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये उत्सव म्हणून साजरी केली जाते. समतेसाठी आयुष्यभर लढणाऱ्या डॉ.भीमराव आंबेडकर यांचा जयंती दिवस त्यांच्या बद्दल आदर व्यक्त करून समता दिन आणि राष्टीय ज्ञान दिवस म्हणूनही साजरा केला जातो. डॉ. आंबेडकर त्यांच्या मानवी हक्क चळवळीसाठी, संविधान निर्मितीसाठी आणि त्यांच्या प्रगल्भ विद्वत्तेसाठी जगभर ओळखले जातात. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
राष्ट्रीय अग्नीशमन दिन
अग्निशमन दिन किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस ( इंग्रजी : National Fire Service Day ) दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो . 14 एप्रिल 1944 रोजी , कापसाच्या गाठी, स्फोटके आणि युद्धसामुग्रीने भरलेल्या फोर्टस्टीकेन नावाच्या मालवाहू जहाजाला मुंबई बंदरात चुकून आग लागली. आग विझवताना जहाजातील स्फोटक पदार्थामुळे 66 अग्निशमन दलाचे जवान शहीद झाले होते. या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांना आग प्रतिबंधक उपायांबद्दल सांगण्यासाठी हा दिवस देशभरात साजरा केला जातो.
15 एप्रिल (बंगाली नववर्ष) (हिमाचल दिवस)
हिमाचल दिवस -हिमाचल प्रदेशमध्ये १५ एप्रिल रोजी हिमाचल दिन साजरा केला जातो. हिमाचल प्रदेशच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हिमाचल दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यानंतर, हिमाचल प्रदेशची स्थापना 15 एप्रिल 1948 रोजी मुख्य आयुक्त प्रांत म्हणून झाली. नंतर 25 जानेवारी 1950 रोजी हिमाचलला "C" श्रेणीचे राज्य बनवण्यात आले. त्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. 1966 मध्ये पंजाबच्या डोंगराळ प्रदेशांचा हिमाचल प्रदेशात समावेश करण्यात आला. 18 डिसेंबर 1970 रोजी संसदेने हिमाचल प्रदेश कायदा संमत केला आणि 25 जानेवारी 1971 रोजी हिमाचल प्रदेश पूर्ण राज्य म्हणून अस्तित्वात आला. हिमाचल प्रदेश हे भारतातील १८ वे राज्य होते.
बंगाली नववर्ष - बंगाली नवीन वर्ष जगभरातील बंगाली लोकांसाठी एक मोठा दिवस आहे. त्याला असे सुद्धा म्हणतात पोहेला बैशाख, तो बंगाली समाजात मोठ्या उत्साहात आणि उत्साहात साजरा केला जातो. नवीन वर्ष बंगाली दिनदर्शिकेच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जे एकतर 14 किंवा 15 एप्रिल रोजी येते. उत्सवात खाद्य महोत्सव, जत्रा आणि इतर गोष्टींचा समावेश आहे!
24 एप्रिल - राष्ट्रीय जलसंपत्ती दिन
24 एप्रिल जलसंपत्ती दिन साजरा केला जातो. पाण्यामुळे जीवन आहे असे म्हणतात. या देशाची सगळ्यात मोठी संपत्ती जनता आहे. निसर्गाची सगळ्यात मोठी संपत्ती असलेले पाणी या जनतेने एकत्र येऊन जर वाचवलं, तर या देशाचा चेहरामोहरा बदलेल. कारण वेगाने कमी होत असलेले पाण्याचे साठे आणि याचा परिणाम म्हणून पाण्याची वाढती मागणी हा आज देशापुढे गंभीर चिंतेचा विषय झाला आहे. मानवी जीवनात अनादी काळापासून पाण्याला विशेष महत्त्व देण्यात आले आ
एप्रिल महिन्यात बँकेला कधी सुटटी असणार आहे?(bank holiday in april 2022)
1 एप्रिल- (ओडिसा दिन)
2 एप्रिल- (गुढी पाडवा)
4 एप्रिल (सारहुल)
5 एप्रिल (बाबु जगजीवनराम जयंती)
10 एप्रिल (राम नवमी)
13 एप्रिल (उगदी,बोहाग,बिहु )
14 एप्रिल (महावीर जयंती ) (आंबेडकर जयंती) बोहाग,बिहु,चिरोबा,विशुभा संक्रांत,वैशाख इत्यादी)
15 एप्रिल (गुड फ्रायडे,बंगाली नव वर्ष,हिमाचल दिन)
17 एप्रिल (ईस्टर संडे)
21 एप्रिल (गौरी पुजा)
29 एप्रिल -जमात ऊल विदा