(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Obesity and Health: दुर्लक्ष करू नका! लठ्ठपणा ठरू शकते 'या' आठ आजाराचे कारण
Obesity and Diseases: आरोग्याच्यादृष्टीने लठ्ठपणा तुम्हाला धोकदायक ठरू शकतो. काही आजार लठ्ठपणामुळे होतात.
Obesity and Diseases: काही आजार असे असतात की, ज्यांच्यामुळे आपल्याला फार त्रास होत नाही. परंतु त्या आजारामुळे इतर आजारांना, व्याधींना आमंत्रण मिळते. लठ्ठपणादेखील अशाच एका आजारापैकी आहे. लठ्ठपणामुळे (Obesity impact on Health) उठणे-बसणे, चालणे यामध्ये त्रास होतो. मात्र, कोलेस्ट्रोलपासून मधुमेह, हृदयविकारासारखे आजार जडले जातात. लठ्ठपणामुळे आठ जीवघेणे आजार होऊ शकतात.
1. ऑस्टियोआर्थराइटिस: लठ्ठपणामुळे वाढलेल्या अतिरिक्त वजनाचा गुडघ्यांवर खूप वाईट परिणाम होतो. अर्थात लठ्ठपणामुळे शरीराच्या इतर भागावरही परिणाम होतो. परंतु काही लोकांसाठी, लठ्ठपणामुळे वाढलेले वजन गुडघ्याच्या सांध्यामध्ये असलेल्या कार्टिलेजचे नुकसान करते. हा त्रास वाढून पुढे ऑस्टियोआर्थरायटिसचे रूप घेते.
2. स्ट्रोक आणि हृदयविकार: ज्या लोकांचे वजन खूप वाढते, त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे अधिक प्रमाण आणि उच्च मधुमेहाची समस्या असते, या दोन्हींमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
3. मधुमेह प्रकार -2: मधुमेह प्रकार -2 हा लठ्ठपणाशी संबंधित सर्वात सामान्य आजारांमध्ये समाविष्ट आहे. हा आजार आपल्या जीवनशैलीशी निगडीत आजार आहे.
4. कर्करोगाचा धोका: लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. काही प्रकारचे कर्करोग हे लठ्ठपणाच्या आजारांमुळे होतात. यामध्ये कोलन कॅन्सर, किडनी कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आदी आजार होण्याची शक्यता आहे.
5. पित्ताशयाचे आजार: तंदुरुस्त लोकांपेक्षा लठ्ठ लोकांमध्ये पित्ताशयाशी संबंधित आजार जास्त प्रमाणात आढळतात. विशेषत: अशा लोकांमध्ये ज्यांचे वजन खूप लवकर वाढते किंवा खूप लवकर वजन कमी होते. म्हणून, वजन कमी करताना, पित्त मूत्राशयाच्या स्टोनची समस्या टाळण्यासाठी, दर आठवड्याला तुमचे वजन एक पौंड कमी होईल याची खात्री करा.
6. झोपेच्या संबंधित आजार: लठ्ठपणामुळे तुम्हाला जास्त झोप किंवा कमी झोप या दोनपैकी कोणतीही समस्या असू शकते. जास्त चरबीमुळे श्वसनमार्गाचा वरचा भाग आकुंचन पावतो, त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होते आणि रक्तपुरवठा मंदावतो, त्यामुळे जास्त झोप लागते.
7. दमा: अमेरिकन लंग असोसिएशनच्या मते, पोट आणि छातीवर जास्त प्रमाणात चरबी जमा झाल्यामुळे फुफ्फुसे संकुचित होतात आणि श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे दम्याची समस्या निर्माण होते.
8. युरिक अॅसिडची समस्या: रक्तातील यूरिक अॅसिड वाढण्याच्या समस्येला गाउट (Gout) म्हणतात. रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधे दुखू लागतात.
(Disclaimer: या बातमीतील मजकूर फक्त माहितीसाठी आहे. आरोग्यासंबंधी आणि इतर आरोग्यविषयक समस्या, उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )