एक्स्प्लोर

धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार

संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणून ओबीसी नेत्यांना टारगेट केलं जात असल्याचा निषेध म्हणून मोठं आंदोलन होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: राज्यभर संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडेच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याठी प्रचंड दबाव वाढला असून विरोधकांसह स्वपक्षीयांनीही धनंजय मुंडेंना घेरल्याचं पहायला मिळत असताना आता मदतीसाठी ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके (Lakshman Hake) मैदानात उतरणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात ओबीसी समाज आंदोलन करणार असून निदर्शने आणि सभा घेणार आहेत. आज (8 जानेवारी) दुपारी बारा वाजता मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते नवनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या आरोपींना कडक शासन करावं तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणून ओबीसी नेत्यांना टारगेट केलं जात असल्याचा निषेध म्हणून मोठं आंदोलन होणार आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. विशेष म्हणजे विरोधकांनीही हे प्रकरण चांगलेच लावून धरले असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, ओबीसी नेते धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याचा आरोप करत मुंडेंच्या बचावासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार आहेत. 

छ. संभाजीनगरमध्ये हाकेंच्या नेतृत्वात आंदोलन

छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात ओबीसी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि सभा आयोजित करण्यात आली आहे.ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी बारा वाजता शहरातील मुख्य क्रांती चौकात हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते नवनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात येणार असून ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्याचा आरोप करत हाकेंच्या नेतृत्वात ओबीसी समाज एकवटणार आहे.

आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी 

दरम्यान, ज्यांनी कुणी हा गुन्हा केलाय त्यांना या प्रकरणाचं गांभीर्यच नाही. त्यामुळं याप्रकरणी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ज्या लोकांवर अजूनही संशय आहे. त्या लोकांवर विविध गुन्हे असतानाही पोलीस संरक्षण दिले गेले होते. मात्र आता या प्रकरणाची गृह खात्याने दाखल घेण्याची गरज आहे असंही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा:

वाल्मिक कराडचा 21 ऑगस्ट 2024 चा 'तो' फोटो आला समोर, संजय राऊतांनी थेट ट्विट करून उडवून दिली खळबळ!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 08 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सPramod Sawant Defamation Special Report : प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी टूलकिट? प्रकरण नेमकं काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 08 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सBuldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटनाBuldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
V Narayanan : इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
Torres Scam : पतीला गाफील ठेवलं, PF ची रक्कम टोरेसमध्ये गुंतवली, लकी ड्रॉमध्ये कार जिंकली, टोरेस गायब होताच महिलेला धक्का
पतीला गाफील ठेवलं, PF ची रक्कम टोरेसमध्ये गुंतवली, लकी ड्रॉमध्ये कार जिंकली, टोरेस गायब होताच महिलेला धक्का
Nagpur Couple Died: बाळ होत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या, लग्नाच्या वाढदिवशीच नवे कपडे घालून गळफास लावून घेतला
बाळ होत नसल्याने दाम्पत्याचं टोकाचं पाऊल, लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून नटले अन् अखेरच्या प्रवासाला निघाले
Embed widget