एक्स्प्लोर

Child Health : पालकांनो सावधान! तुमच्या मुलांना Myopia तर नाही ना? एका अभ्यासातून समोर, लक्षणं जाणून घ्या

Child Health : एका अभ्यासानुसार, मायोपियाची रुग्णसंख्या वाढण्यामागील कारण जास्त स्क्रीन वेळ आहे. कोविड-19 नंतर मुलांमध्ये मायोपियाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

Child Health : अलीकडेच एका अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यात असं म्हटलंय की, कोविड-19 साथीच्या (Covid-19) आजारानंतर मुलांमध्ये मायोपियाच्या (Myopia) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता दर तीन मुलांपैकी एक मायोपियाचा बळी आहे. मायोपिया, ज्यामध्ये दूरच्या वस्तू पाहण्यात अडचण येते. असा अंदाज आहे की 2050 पर्यंत लहान मुलांमध्ये मायोपियाची संख्या 74 कोटींपर्यंत पोहोचू शकते. आज आपण मायोपियाची कारणे आणि मायोपिया टाळण्यासाठी टिप्स जाणून घेऊ.

 

मुलांमध्ये मायोपिया वाढण्याचे कारण काय आहे?

अभ्यासानुसार, मायोपियाची रुग्णसंख्या वाढण्यामागील कारण जास्त स्क्रीन वेळ आहे. कोविड-19 महामारीच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्याचा पर्याय नव्हता. त्यामुळे मुलांच्या शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंत सर्व काही मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून घडले. लॉकडाऊननंतरही मुलं त्यांचा बहुतांश वेळ फोन किंवा कॉम्प्युटरसमोर घालवतात. त्यामुळे त्याचा स्क्रीन टाईम खूपच वाढला आहे.

 

अनुवांशिकता - जर पालकांपैकी एकाला किंवा दोघांनाही मायोपिया असेल तर त्यांच्या मुलांनाही हा आजार होण्याची शक्यता असते.

मैदानी खेळांचा अभाव - बाहेर खेळणे आणि सूर्यप्रकाशात राहणे यामुळे डोळ्यांना विश्रांती मिळते आणि मायोपियाचा धोका कमी होतो. पण त्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांना नुकसान होते.

कमी प्रकाशात वाचणे- कमी प्रकाशात फोन पाहणे किंवा वापरणे यामुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो, ज्यामुळे मायोपिया होऊ शकतो.

 

मायोपिया टाळण्याचे मार्ग

मायोपिया पूर्णपणे रोखणे कठीण होऊ शकते, विशेषतः जर त्याचा कौटुंबिक इतिहास असेल. काही उपायांचा अवलंब करून त्याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो, जसे की-

मैदानी खेळांना प्रोत्साहन द्या- मुलांना दररोज किमान 2-3 तास बाहेर खेळण्यास प्रोत्साहित करा.

मर्यादित स्क्रीन वेळ - संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन दररोज 2 तासांपेक्षा जास्त वापरु नये.

डोळ्यांना विश्रांती देणे - डोळ्यांना नियमित विश्रांती देण्यासाठी 20-20-20 नियम पाळा. याचा अर्थ, स्क्रीन टाइमच्या प्रत्येक 20 मिनिटांनंतर, 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर काहीतरी पहा.

योग्य प्रकाशात वाचन - अभ्यास करताना मुलांच्या खोलीतील प्रकाश योग्य असल्याची खात्री करा आणि त्यांना अंधारात फोन वापरू देऊ नका.

नियमित डोळ्यांची तपासणी - मुलांचे डोळे नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून मायोपियाची सुरुवातीची लक्षणे शोधून त्यावर योग्य उपचार करता येतील.

पोषणाकडे लक्ष द्या - मुलाच्या आहारात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर असावे.

डोळ्यांचे व्यायाम करणे - डोळ्यांचे काही व्यायाम देखील मायोपिया टाळण्यास मदत करू शकतात. यामध्ये डोळे फिरवणे, डोळे बंद करणे, आराम करणे, दूरच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करणे यांचा समावेश असू शकतो.

 

हेही वाचा>>>

Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget