Health Tips : सैंधव मिठाचं पाणी प्यायल्यास 'हे' 10 आजार होतील दूर; रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल
Health Tips : सैंधव मीठ पूर्णपणे नैसर्गिक आहे. हे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करते.

Health Tips : मीठ आरोग्यासाठी किती घातक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मिठाचं सेवन खाल्ल्याने उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. यामुळे मिठाचं सेवन कमी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. जास्त मिठाचं सेवन करणाऱ्या लोकांना अनेक आजारांचा धोका असतो. पण सैंधव मीठ पूर्णपणे नैसर्गिक आहे. हे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम करते. त्याला रॉक सॉल्ट किंवा हिमालयन सॉल्ट असेही म्हणतात. सैंधव मीठाचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास 10 प्रकारचे गंभीर आजार बरे होतात असं आहार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
सैंधव मीठाचे पाणी प्यायल्याने 10 आजार दूर होतात
1. पाचन तंत्र
सैंधव मिठाचं पाणी पोटाशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी सैंधव मिठाचं पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल वाढते. जे अन्न पचन आणि शोषण्यास मदत करते. याने अपचन, गॅस आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांवर मात करता येते.
2. बॉडी डिटॉक्स करणयास मदत होते
सैंधव मीठ शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य वाढवण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील घाण बाहेर येते. ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार बरे होऊ शकतात.
3. चयापचय वाढवण्यासाठी उपयुक्त
सैंधव मिठाचं पाण्याचे सेवन केल्यास चयापचय वाढते. यामुळे मधुमेहासारख्या चयापचय समस्या दूर राहतात. चयापचय गती वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील फॅट झपाट्याने कमी होते.
4. इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता
NCBI च्या मते, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह सारखी 84 खनिजे सैंधव मिठात आढळतात. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स संतुलित राहतात. उन्हाळ्यात शरीरात इलेक्ट्रोलाईट्सच्या कमतरतेमुळे सतत थकवा, अशक्तपणा यांसारख्या समस्या उद्भवतात.
5. तणावापासून दूर राहण्यास महत होते
सैंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्टचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे पाणी प्यायल्यास मानसिक समस्या दूर राहतात. हे पाणी प्यायल्याने तणाव दूर होतो. तसेच, तणावासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते.
हे सैंधव मीठ पाण्याचे फायदे देखील आहेत
6. मजबूत फुफ्फुसे
7. मजबूत हाडे
8. निर्जलीकरण उपचार
9. पीएच पातळीमध्ये संतुलन
10. निरोगी आणि ताजी त्वचा
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
