Hair Care Tips : पांढरे केस उपटून काढणं पडू शकतं महागात; वाचा केस पांढरे का होतात आणि त्यामुळे होणारे नुकसान
Premature Grey Hair : आजकाल प्रदूषण, रसायने आणि खराब जीवनशैलीमुळे केस पांढरे होण्याची समस्या लहानपणापासूनच सुरू होते. ते लपवण्यासाठी अनेकवेळा लोक उपटून टाकतात.
Premature Grey Hair : आपल्या केसांना सुंदर (Hair Care Tips) आणि घनदाट बनवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयोग करतो. घरच्या घरी हेअर मास्क लावण्यापासून ते सलूनमध्ये तासनतास घालवण्यापर्यंत आपण सर्व काही करून पाहतो. पण, तरीही केसांची समस्या सुटत नाही. केस गळणे, केस तुटणे आणि ही यादी पुढे जाते. या समस्यांमध्ये केस अकाली पांढरे होणे देखील समाविष्ट आहे. लहान वयात केस पांढरे होणे याला केस अकाली पांढरे होणे म्हणतात. तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक सवयींचाही यात समावेश असू शकतो. हे पांढरे केस तुम्हाला खूप त्रास देऊ शकतात. ते लपवण्यासाठी, बरेच लोक केसांना रंग लावतात, मेहंदी लावतात. पण, पांढरे केस उपटून काढल्याने अनेक परिणाम भोगावे लागतात. पांढरे केस उपटून काढल्याने तुम्हाला कोणते नुकसान सहन करावे लागू शकते या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
केस पांढरे का होतात?
केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी मेलानोसाईट्स नावाच्या पेशी कमी झाल्यामुळे होते. या पेशी एक रंगद्रव्य तयार करतात, ज्यामुळे केसांना रंग येतो. वयानुसार या पेशी कमी होऊ लागतात, त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. याची इतरही अनेक कारणे असू शकतात, जसे की आनुवंशिकता, खाण्याच्या सवयी, पोषक तत्वांचा अभाव, धूम्रपान, स्टाइलिंग टूल्स किंवा ब्लीचचा अतिवापर, तणाव, प्रदूषण आणि अनेक आजारांमुळे देखील केस अकाली पांढरे होण्याची समस्या असू शकते.
पांढरे केस उपटून काढले म्हणजे तुमचे इतर केस देखील पांढरे होऊ लागतात असे नाही. पण, त्यामुळे इतर अनेक समस्या नक्कीच उद्भवू शकतात. पांढरे केस उपटून काढल्याने नेमके होणारे नुकसान कोणते ते पाहा.
संसर्गाचा धोका
केस ओढल्याने मुळांमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. संसर्गामुळे पुरळ आणि इतर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पांढरे केस मुळापासून उपटणे टाळा.
Follicle केसांचे नुकसान होणे
केस बळजबरीने उपटल्याने फॉलिकल्सचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे केसांची वाढ मंदावते किंवा केस वाढू शकत नाहीत. त्यामुळे केस उपटू नका.
टाळूची जळजळ होणे
मुळापासून केस काढून टाकल्यामुळे, टाळूमध्ये केसांची जळजळ होण्याचा धोका असतो. त्यामुळे पुरळ उठणे, खाज येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
हायपरपिग्मेंटेशन
केस वारंवार उपटून काढल्यामुळे त्या ठिकाणी हायपरपिग्मेंटेशन होण्याचा धोका असतो. यामुळे तुमची टाळू खराब होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.