Skin Care : ब्युटी प्रोडक्सट्स खरेदी करताय? 'या' गोष्टींची काळजी घ्या, निखळ सौंदर्य मिळवा
Skin Care Tips : त्वचा चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला तजेलदार त्वचा मिळेल.
Glowing Skin Tips : प्रत्येकाला सुंदर, निरोगी आणि चमकदार त्वचा (Shiny, Healthy Skin) हवी असते. अशा त्वचेसाठी त्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. त्वचेला योग्य पोषण मिळण्यासाठी योग्य पोषक आहार घेणं आवश्यक आहे. सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी शरीराच्या आतून आणि बाहेरुन दोन्ही प्रकारे पोषण मिळणं गरजेचं आहे. योग्य आहार घेण्यासोबतच तुम्ही कोणती सौंदर्य प्रसाधनं वापरता हेही महत्त्वाचं आहे. तुमच्या त्वचेला अनुरुप प्रोडक्ट वापरणं आवश्यक आहे.
महागडे प्रोडक्ट वापरल्यावरच तुम्ही सुंदर दिसता असा तुमचा समज असेल तर हे पूर्ण चुकीचं आहे. तुमच्या त्वचेनुसार योग्य सौंदर्य प्रसाधनं वापरल्यानेच तुम्हाला फायदा होईल. कोणतेही प्रोडक्ट्स वापरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
1. गैरसमज दूर करा.
सध्या बाजारात विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधनं उपलब्ध आहेत. यामुळे प्रोडक्टच्या जाहिरातीवर भुलून उत्पादनं खरेदी करु नका. तुमच्या त्वचेसाठी काय आवश्यक आहे, त्याला अनुसरून उत्पादनं खरेदी करा.
2. पॅच टेस्ट करा.
कोणतेही प्रोडक्ट खरेदी केल्यावर त्यांची हातावर, मानेवर किंवा चेहऱ्यावर पॅच टेस्ट करा. यामुळे त्या उत्पादनाचा तुमच्या चेहऱ्यावर काय परिणाम होईल हे कळेल.
3. कोणत्या वयात कोणती उत्पादनं वापराल?
तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार सौंदर्य उत्पादनं वापरा. साधारणपणे वयाच्या 25 वर्षांपर्यंतच्या लोकांची त्वचा तेलकट असते. याशिवाय अशा लोकांना पिंपल्सची समस्या जास्त असते. त्यामुळे अशा लोकांनी वॉटर बेस्ड प्रोडक्ट वापरावेत. तर 25 ते 35 वर्ष वय असलेल्या व्यक्तींनी मॉइश्चराईज करणाऱ्या प्रोडक्टचा वापर करावा. जर तुमची त्वचा तेलकट आहे आणि मुरुमांची समस्या कायम असेल तर वॉटर बेस्ड प्रोडक्ट वापरणं फायदेशीर राहील. ज्यांची त्वचा ड्राय असेल तर तुम्ही क्रिम आणि मॉइश्चराईज करणारे प्रोडक्ट वापरा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :