Weight Loss : वजन कमी करताना करु नका 'ही' चूक, होईल नुकसान; वाचा सविस्तर
Weight Loss Tips : आहार (Diet) आणि व्यायाम यांची योग्य प्रकारे सांगड घातल्यास तुम्हाला वजन कमी करता येईल. यावेळी 4 गोष्टींची काळजी घेणं गरजेच आहे.
Common Mistakes When Trying to Lose Weight : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वजन वाढणं आणि लठ्ठपणाची समस्येनं अनेक जण त्रस्त असतात. व्यस्त जीवनशैलीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. बहुतेक लोक वाढलेलं वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट करतात. मात्र हे करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तुमचं वजन कमी होण्यावर ब्रेक लागेल. या गोष्टी कोणत्या आहेत जाणून घ्या.
1. ताणतणावापासून दूर राहा.
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये सर्वांनाच ताणतणावाचा सामना करावा लागतो. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जेव्हा तुम्ही तणावात असता, तेव्हा तुमच्या शरीरात कोर्टिसोल नावाचं हार्मोन स्रावित होतं. यामुळे चयापचय क्रिया मंद होते यामुळे वजन कमी करण्यात अडथळे येऊ शकतात.
2. असंतुलित आणि चुकीचा आहार
वजन कमी करताना व्यायाम करण्यासोबतच योग्य आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. काही जण कामत व्यस्त असल्यामुळे किंवा आळसापोटी नाश्ता आणि जेवण करत नाहीत, यामुळे वजन कमी होण्याऐवजी तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. यामुळे तुमचं वजन कमी होण्याची गती मंद होते. याशिवाय फास्ट फूड खाणं टाळा. त्याऐवजी योग्य सकस आहार घ्या.
3. दारूचं सेवन
वजन कमी करायचं असेल तर दारुचं सेवन टाळा. दारुमध्ये अनेक कॅलरीज असतात. यापासून तुम्हाला उर्जा मिळत नाही पण शरीरातील कॅलरीज मात्र वाढतात. यामुळे तुमचं वजन वाढतं. त्यासाठी वजन की करायचं असेल तर दारुचं सेवन करणं टाळा.
4. रात्री उशीरापर्यंत जागणे
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट आणि व्यायाम करत असाल, तर तुम्हांला पुरेशी झोप घेणंही गरजेचं आहे. उशीरापर्यंत जागण्याची सवय तुमचं वजन कमी करण्यात अडथळा बनू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Fungal Infection : पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा धोका, अशी मिळवा सुटका
-
Flu Symptoms : कोरोना आहे की व्हायरल फ्लू? कसा ओळखाल? जाणून घ्या...
- Health Tips : पावसाळ्यात संधिवातच्या समस्येपासून सुटका हवीय? या गोष्टींची काळजी घ्या...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )