
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते' आता बंगाली भाषेत डब होणार; मालिका उत्कंठावर्धक वळणावर
Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते' ही मालिका आता बंगाली भाषेत डब होणार आहे.

Tumchi Mulgi kay Karte : 'तुमची मुलगी काय करते' (Tumchi Mulgi kay Karte) ही वेगळ्या धाटणीची मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. चित्तथरारक अशा या मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. आता ही मालिका बंगाली भाषेत डब होणार आहे.
'तुमची मुलगी काय करते' या मालिकेचे आता 300 भाग पूर्ण झाले आहेत. एका मराठी मालिकेचं बंगाली भाषेत डबिंग होणं ही छोट्या पडद्यासाठी आनंदाची बाब आहे. 'तुमची मुलगी काय करते?' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे.
View this post on Instagram
मधुरा वेलणकर 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मधुराने बारा वर्षांनी या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. मधुरासह हरीश दुधाणेदेखील या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेची कथा आई आणि मुलीभोवती फिरताना दिसत आहे.
मधुराचं कमबॅक
मधुराचे वडील प्रदीप वेलणकर हे लोकप्रिय अभिनेते आहेत. मधुरा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. मधुराने 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेच्या माध्यमातून 12 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. तिने अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांतदेखील काम केलं आहे.
संबंधित बातम्या
Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते?' मालिकेत होणार क्षिती जोगची एन्ट्री; दोन मैत्रिणी पुन्हा एकत्र झळकणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
