![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते?' मालिकेत होणार क्षिती जोगची एन्ट्री; दोन मैत्रिणी पुन्हा एकत्र झळकणार
Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेत आता अभिनेत्री क्षिती जोगची एन्ट्री होणार आहे.
![Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते?' मालिकेत होणार क्षिती जोगची एन्ट्री; दोन मैत्रिणी पुन्हा एकत्र झळकणार Tumchi Mulgi Kay Karte marathi serial Kshitee Jog entry in the series Two friends will appear together again Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते?' मालिकेत होणार क्षिती जोगची एन्ट्री; दोन मैत्रिणी पुन्हा एकत्र झळकणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/60f7ea5b2d65cd1bb48115e6f6ab02cf1664010373255254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते?' (Tumchi Mulgi Kay Karte) ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. सध्या या मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट येत आहेत. आता या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोगची (Kshitee Jog) एन्ट्री होणार आहे.
रुईया कॉलेजमध्ये असताना एकांकिकेत काम केलेल्या आणि आज कलाविश्वात उत्तम अभिनेत्री असलेल्या दोन जिवाभावाच्या मैत्रिणी बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.
'तुमची मुलगी काय करते?' मालिकेची निर्माती आणि अभिनेत्री मनवा नाईक या मालिकेत असून मनवाच्या कॉलेजमधल्या जोडीदाराची आता एन्ट्री होणार आहे. हा निवळ योगायोग आहे. 'तुमची मुलगी काय करते?' मालिकेत अभिनेत्री क्षिती जोगची एन्ट्री होणार आहे.
View this post on Instagram
क्षिती जोग 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेत पोलीस इंस्पेक्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर एकत्र काम करण्याची मिळालेली संधी मनवा आणि क्षिती यांना पुन्हा एकदा त्यांच्या कॉलेजलाईफच्या फ्लॅशबॅकमध्ये नेईल यात शंकाच नाही. मनवाला तर आपण आधीपासूनच मालिकेत पाहतोय मात्र आता क्षितीला पोलिसाच्या भूमिकेत पाहणं रंजक ठरणार आहे.
तुमची मुलगी काय करते?
कुठे पाहू शकता? सोनी मराठी
किती वाजता? सोम. ते शनि. रात्री 10 वाजता
संबंधित बातम्या
Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते' मालिकेचे 200 भाग पूर्ण
Marathi Natak : 'चारचौघी' ते 'अलबत्या गलबत्या', वीकेंडला नाट्यरसिकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)