एक्स्प्लोर

विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश आल्यानंतर पक्षाने आता बंडखोरांसह पक्षविरोधी काम करणाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. 

नाशिक : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) बंडखोरांवर कारवाई केल्यानंतर आता पक्षविरोधी काम करणारे माजी नगरसेवक शशिकांत जाधव (Shashikant Jadhav) यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भाजपातून हकालपट्टी करावी, अशी मागणी आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांच्यासह सातपूर मंडलाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जाधव (Prashant Jadhav) यांच्याकडे करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला (BJP) घवघवीत यश आल्यानंतर पक्षाने आता बंडखोरांसह पक्षविरोधी काम करणाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. 

विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्हीही जागांवर भाजपाचे विद्यमान आमदारच निवडून आले. भाजपाने हे यश मिळविल्यानंतर आता पक्ष सोडून गेलेले अनेकजण पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात अनेकांनी बंडखोरी करत पक्षविरोधी काम केल्याचे समोर आले आहे.

शशिकांत जाधवांची हकालपट्टी करा 

ऐन निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या माजी नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील यांच्यासह भाजपा कामगार मोर्चाचे विक्रम नागरे, अमोल पाटील, सार्थक नागरे, स्वप्नील पाटील, नीलेश भंदुरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात पक्षात राहून पक्ष विरोधी भूमिका बजावणाऱ्याकडे पक्षाने आपली वक्रदृष्टी वळवली आहे. यामध्ये माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांचा समावेश आहे. 

सुधाकर बडगुजरांचा प्रचार केल्याचा आरोप

जाधव हे ऐन निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश करणार होते. मात्र, त्यांचा काही कारणास्तव पक्षप्रवेश होऊ शकला नाही, असे असताना देखील त्यांनी भाजपा उमेदवार सीमा हिरे यांचे काम न करता विरोधी पक्षातील शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांचा प्रचार केला असल्याचा स्पष्ट आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पत्रावर आमदार सीमा हिरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, गणेश बोलकर, रामहरी संभेराव, रवींद्र जोशी, शिवाजी शहाने, सीए मनोज तांबे, राजेश दराडे, संजय राऊत आदींसह सातपूर मंडल पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा

भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशकमध्ये काय चाललंय काय? गेल्या तीन महिन्यात खूनाच्या 8-10 घटना; जाब विचारल्याने टोळक्याच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर
नाशकात काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
तेव्हा मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपा आणि राणे गँगने संबंध जोडून थयथयाट केला, आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, आता सुषमा अंधारे तोच स्क्रीनशाॅट शेअर करत म्हणाल्या....
तेव्हा मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपा आणि राणे गँगने संबंध जोडून थयथयाट केला, आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, आता सुषमा अंधारे तोच स्क्रीनशाॅट शेअर करत म्हणाल्या....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Chandrashekhar Bawankule Meet : आदित्य ठाकरे-बावनकुळे यांची विधान भवनात भेटABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 20 March 2025Anmol Ratna Award 2025 Episode 3 : महाराष्ट्रातील उद्योग रत्नांचा सन्मान : अनमोल रत्न पुरस्कारDisha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशकमध्ये काय चाललंय काय? गेल्या तीन महिन्यात खूनाच्या 8-10 घटना; जाब विचारल्याने टोळक्याच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर
नाशकात काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
तेव्हा मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपा आणि राणे गँगने संबंध जोडून थयथयाट केला, आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, आता सुषमा अंधारे तोच स्क्रीनशाॅट शेअर करत म्हणाल्या....
तेव्हा मनिषा कायंदे म्हणाल्या, भाजपा आणि राणे गँगने संबंध जोडून थयथयाट केला, आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, आता सुषमा अंधारे तोच स्क्रीनशाॅट शेअर करत म्हणाल्या....
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
औरंगजेब 1300 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत, संतोष जुवेकरच्या जीवात जीव आला, दिशाने आघाडी घेतली! राज्यातील राजकीय चिखलफेकीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Disha Salian Lawyer : उद्धव ठाकरेंचं गुंडांचं सरकार होतं; मविआच्या काळात कुणाकडे दाद मागणार?
Team India : बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
बीसीसीआयकडून 'चॅम्पियन' टीम इंडियाला आयसीसीच्या बक्षीसाच्या तीनपट खजिना! रोहितपासून गंभीरपर्यंत, कोणाला किती कोटी मिळणार?
Embed widget