(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha
राज्यात सध्या नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे. सध्या महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मंत्रिपदांची वाटाघाटी होत आहे. निवडणुकीदरम्यान महायुतीने नागरिकांना अनेक मोठी-मोठी आश्वासनं दिली होती. दरम्यान, ही आश्वासनं पूर्ण होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी नव्या सरकारच्या काळात सर्वसमान्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने तब्बल 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. एसटी महामंडळाचा नेमका प्रस्ताव काय? मिळालेल्या माहितीनुसार नव्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे. कारण एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे तब्बल 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. सातत्याने होत असलेल्या महागाईमुळे एसटी महामंडळाने 18 टक्के भाडेवाढीचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीपुर्वीच हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र शिंदे सरकारच्या काळात हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता.