Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाश छोट्या पडद्यावरची क्विन; 'नागिन 6'च्या एका एपिसोडसाठी घेतले एवढे मानधन
Tejasswi Prakash Nagin 6 Serial Fees : 'नागिन 6' (Nagin 6) या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) घराघरांत पोहोचली आहे. 'बिग बॉस 15'मुळे तेजस्वीच्या लोकप्रियतेत वाढ झाली. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'बिग बॉस 15'ची विजेती असलेली तेजस्वी 'नागिन 6' या मालिकेत मुख्य भूमिकेत होती.
Chala Hawa Yeu Dya: ''चला हवा येऊ द्या' च्या मंचावर बच्चे कंपनीची धम्माल कॉमेडी; प्रोमो पाहून खळखळून हसाल
Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमामध्ये विविध कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. या कार्यक्रमात विविध सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात बच्चे कंपनीची एन्ट्री झाली आहे. या बच्चे कंपनीच्या कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना आवडत आहे. नुकताच 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दोन लहान मुली कॉमेडी स्किट सादर करताना दिसत आहेत.
Aai Kuthe Kay Karte: यशची अवस्था बघून अनिरुद्ध झाला भावूक; 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो व्हायरल
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये यशचा अपघात आहे, असं दाखवण्यात आलं होतं. सध्या यशवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अनिरुद्ध हा यशची अवस्था बघून भावूक झाला आहे.
Mi Honar Superstar Jallosh Juniorscha : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा रंगणार महाअंतिम सोहळा! जाणून घ्या कधी होणार ग्रॅंड फिनाले...
Mi Honar Superstar Jallosh Juniorscha Grand Finale : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम आहे. आता हा कार्यकम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका रंजक वळणावर; अनिरुद्ध आणि वीणा आशुतोषच्या ऑफिसमधून करणार काम
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांत या मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट येत आहेत. आता या मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. या मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध आणि वीणा आशुतोषच्या ऑफिसमधून काम करताना दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
