Naagin 6 : तेजस्वी प्रकाशची 'नागिन 6' प्रेक्षकांचा घेणार निरोप; 7 ऑक्टोबरला होणार शेवटचा एपिसोड प्रसारित
Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाशची 'नागिन 6' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेजस्वी 'बिग बॉस 15'ची विजेती ठरली होती. त्यानंतर लगेचच तिला 'नागिन 6' (Naagin 6) साठी विचारणा झाली. 'नागिन 6'मध्ये तेजस्वी प्रकाश मुख्य भूमिकेत होती. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
तेजस्वी प्रकाश, सिंबा नागपाल आणि महक चहल 'नागिन 6' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रथा आणि ऋषभची प्रेमकथा पाहायला प्रेक्षकांना आवडत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका अव्वल स्थानावर आहे. मालिकेच्या आगामी भागात तेजस्वीला सत्य समजणार आहे. सत्य समजल्यानंतर लगेचच ही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे.
'नागिन 6' या मालिकेत लवकरच प्रथा लग्नबंधनात अडकणार आहे. 7 ऑक्टोबर 2022 रोजी या मालिकेच्या शेवटच्या भागाचे प्रसारण होणार आहे. एकता कपूरच्या बालाजी टेलीफिल्म्सने या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेत तेजस्वी प्रकाश, सिंबा नागपाल आणि महक चहल व्यतिरिक्त सुधा चंद्रन, मनित जौरा, रीमा वोरा, बकुल ठक्कर, उर्वशी ढोलकिया आणि अभिषेक वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
तेजस्वी प्रकाशने 'या' मालिकांत केलं काम
'2612' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रातील करिअरला तेजस्वीने सुरुवात केली. त्यानंतर ती संस्कार धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, 'पहरेदार पिया की' व 'सिलसिला बदलते रिश्तों का' अशा टीव्हीवरील मालिकांमध्ये दिसून आली आहे. मालिकांसोबतच तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटीशो देखील केले आहेत. 'खतरों के खिलाड़ी 10' व्यतिरिक्त ती 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' व 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये दिसली आहे.
संबंधित बातम्या