Mi Honar Superstar Jallosh Juniorscha : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा रंगणार महाअंतिम सोहळा! जाणून घ्या कधी होणार ग्रॅंड फिनाले...
Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा हा बहुचर्चित कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
![Mi Honar Superstar Jallosh Juniorscha : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा रंगणार महाअंतिम सोहळा! जाणून घ्या कधी होणार ग्रॅंड फिनाले... Mi Honar Superstar Jallosh Juniorscha Grand Finale date know details latest update Marathi Entertainment News Mi Honar Superstar Jallosh Juniorscha : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा रंगणार महाअंतिम सोहळा! जाणून घ्या कधी होणार ग्रॅंड फिनाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/29/4858867c4bef4dcb48416541114de0031685342757735254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mi Honar Superstar Jallosh Juniorscha Grand Finale : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम आहे. आता हा कार्यकम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.
'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा महाअंतिम सोहळा कधी पार पडणार?
'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या शनिवारी आणि रविवारी पार पडणार आहे. 3 आणि 4 जूनला रात्री 9. वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा महाअंतिम सोहळा पाहायला मिळणार आहे. ज्युनियर सुपरस्टार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा हा कार्यक्रम 18 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. महाराष्ट्रभरातील चार ते 14 वर्षे वयोगटातील छोट्या कलाकारांनी आपल्यातलं टॅलेंट या मंचावर दाखवलं. ग्रुप डान्स, सोलो डान्स असे नृत्याचे वेगवेगळे प्रकार त्यांनी या मंचावर सादर करत प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. लहान मुलांसह मोठ्यांनीही हा कार्यक्रम आवडीने पाहिला आहे.
'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा या कार्यक्रमात अभिनेता अंकुश चौधरी परिक्षकाच्या भूमिकेत आहे. तर समृद्धी केळकर आणि चिमुकली साईशा साळवी हा कार्यक्रम होस्ट करत आहे. तर फुलवा खामकर आणि वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत. 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स' या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धक वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत या कार्यक्रमाला 4.1 रेटिंग मिळाले आहे.
Marathi Entertainment News : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' लवकरच होणार सुरू (Me Honar Superstar - Chhote Ustaad 2 Latest Update)
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' (Me Honar Superstar - Chhote Ustaad 2) या लोकप्रिय कार्यक्रमाचं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 10 जूनपासून हा कार्यक्रम सुरू होत आहे. अभिनेत्री वैभवी परशुरामी हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा छोट्यांच्या सुरांची मैफिल अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाची आता सर्वांना उत्सुकता आहे.
Marathi Entertainment News संबंधित बातम्या
Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा रंगणार 'महाराष्ट्र दिन' विशेष भाग; महाराष्ट्राच्या महान व्यक्तींना ज्युनियर्सची जल्लोषपूर्ण मानवंदना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)