IPS Transfer : मनोज कुमार शर्मांकडे मोठी जबाबदारी, यशस्वी यादवांना सायबरमध्ये बढती, 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
IPS Transfer List : शोक मोराळे यांची मोटार वाहन विभागात तर राजीव जैन यांची राज्य राखीव पोलिस विभागात बदली करण्यात आली आहे.

मुंबई : एकीकडे राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असताना आता 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. तशा पद्धतीचा जीआर राज्याच्या गृहखात्याने काढला आहे. त्यामध्ये मनोज कुमार शर्मा यांची राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. त्याचसोबत आर बी डहाळे यांची राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीतून राज्य गुन्हे अभिलेख केंद्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदावर बदली करण्यात आली आहे.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी यशस्वी यादव यांची सायबर सेलच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदावरून पदोन्नती झाली असून त्यांच्याकडे आता सायबर सेलच्या अपर पोलिस महासंचालकपदाचा पदभार असणार आहे.
Maharashtra IPS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?
मनोज कुमार शर्मां- विशेष पोलिस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था
आर बी डहाळे - विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अभिलेख केंद्र
शोक मोराळे - विशेष पोलिस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग
राजीव जैन - विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल
निखील गुप्ता - अपर पोलिस महसंचालक, कायदा आणि सुव्यवस्था
सूरेश मेखला - अपर पोलिस महसंचालक, आर्थिक गुन्हे शाखा
यशस्वी यादव - अपर पोलिस महासंचालक, सायबर सेल
सुहास वारके - अपर पोलिस महासंचालक, कारागृह आणि सुधारसेवा
अश्वती दोर्जे - अपर पोलिस महासंचालक, महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग
छेरिंग दोर्जे - अपर पोलिस महासंचालक, विशेष अभियान
के एम मल्लिकार्जुन - अपर पोलिस महासंचालक, प्रशासन
अभिषेक त्रिमुखे - अपर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग
श्रेणिक लोढा - अपर पोलिस अधीक्षक, खामगाव बुलढाणा
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका
राज्यात नवीन सरकार आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे आदेश निघाले. त्यानुसार आतापर्यंत अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
ही बातमी वाचा:
- IAS Transfer List : राजेंद्र निंबाळकर 'सारथी'मध्ये तर राजेंद्र भारुड RUSA संचालक; प्रशासनातील खांदेपालट थांबेना, बदल्यांचा धडाका सुरूच
- Majha Katta : शिपायाचं काम केलं, श्रीमंतांची कुत्री फिरवली, संघर्ष केला पण IPS झाला; '12th Fail' मनोज कुमार शर्मांची इनसाईड स्टोरी
























