Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' मालिकेत नवा ट्विस्ट; राज हंचनाळे रावणाच्या भूमिकेत
Jivachi Hotiya Kahili : 'जिवाची होतिया काहिली' मालिकेत अभिनेता राज हंचनाळे रावणाच्या विशेष भूमिकेत दिसून येणार आहे.

Jivachi Hotiya Kahili : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवरील मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सध्या 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत मराठी आणि कानडी भाषिक प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसत आहे.
'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे प्रमुख भूमिकेत आहे. आता या मालिकेत राज एका विशेष भूमिकेत दिसून येणार आहे.
राज दिसणार रावणाच्या भूमिकेत
नवरात्रीनिमित्त मालिकेत विशेष यक्षगणचे चित्रीकरण सुरू असून त्यात राजची विशेष भूमिका पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे. विशेष म्हणजे राज या विशेष भागादरम्यान रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकांमध्ये मुख्य नायक त्याच्या रोजच्या भूमिकेहून एक वेगळी भूमिका साकारतोय असे सहसा होत नाही आणि हे 'जिवाची होतिया काहिली मालिके'दरम्यान पाहायला मिळणार आहे. राजला म्हणजे अर्जुनला रावणाच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना नक्कीच भावेल.
View this post on Instagram
राजने साकारलेल्या त्याच्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेबद्दल तो म्हणाला की,"छोट्या पडद्याच्या माध्यमातून यक्षागण ही कर्नाटकातील एक आगळी वेगळी संस्कृती अनुभवायला मिळणार आहे आणि मी त्याचा भाग आहे यासाठी मी खूप उत्सुक आहे. मालिकेत यक्षागणचे चित्रीकरण सुरू असून मी रावणाची भूमिका साकारतोय, त्यासाठी लागणारा पेहराव, मुकुट परिधान करून चित्रीकरण करणं माझ्यासाठी तारेवरची कसरत आहे, मात्र मी आनंदी आणि उत्सुक असल्याने हे सारं सुरळीत निभावतोय. मेकअपसाठी पण मला एक तास बसावं लागत आहे. एकूणच या चित्रीकरणाचा अनुभव अविस्मरणीय आहे."
जिवाची होतिया काहिली
कुठे पाहू शकता? सोनी मराठी
किती वाजता? सोमवार ते शनिवार, संध्या. 7.30वा.
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 4 : उद्यापासून रंगणार 100 दिवसांचा खेळ; 'बिग बॉस मराठी 4'चा होणार ग्रॅंड प्रीमियर
Gandhi Talks : साऊथच्या दिग्गज कलाकारांसोबत झळकणार सिद्धार्थ जाधव, ‘गांधी जयंती’च्या निमित्ताने नव्या मूकपटाची घोषणा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
