Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरातून मोठी अपडेट, जान्हवी पैशांची बॅग घेऊन पडली बाहेर? नाही पाहिली ट्रॉफीची वाट?
Jahnavi Killekar Bigg Boss Marathi : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आज होणार 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेवर लागले आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आज होणार 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेवर लागले आहे. यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या चर्चेत आहे. आता शेवटही धमाकेदार होणार आहे. दरम्यान याआधी बिग बॉसच्या घरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जान्हवी किल्लेकर पैशांची बॅग घेऊन बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. यामध्ये किती तथ्य आहे हे थोड्याच वेळात कळले.
View this post on Instagram
यंदाचा बिग बॉस मराठी सीजन 70 दिवसात संपणार आहे. पण या सीजनला महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. तसेच यंदाच्या सीझनने रेकॉर्ड्स ब्रेक केले आहे. अभिजित सावंत (Abhijeet Sawant), निक्की तांबोळी (Nikki Tamboli), धनंजय पोवार (Dhanjay Powar), सूरज चव्हाण (Suraj Chavhan), जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar), अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) हे सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोहचले आहेत. त्यांच्या लाडक्या सदस्याला जिंकवण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर व्होटिंग केलं आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आता मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. यानंतर अंकिता वालावलकर आणि तिसऱ्या क्रमांकावर अभिजित सावंत आहे. धनंजय पोवार चौथ्या क्रमांकावर आहे. व्होटिंग ट्रेंड्समध्ये निक्की तांबोळी पाचव्या क्रमांकावर तर जान्हवी किल्लेकर पिछाडीवर असल्याचं बोलल्या जात आहे.
बिग बॉस मराठी 5 च्या विजेत्या होणार मालामाल?
बिग बॉस मराठी पाचव्या सीझनसाठी विजेत्याला 25 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे होतं. पण घरातील सदस्यांना टास्कमध्ये ही रक्कम जिंकावी लागणार होती. एका चक्रव्यूह टास्कमध्ये घरातील सदस्यांनी 25 लाख रुपयांपैकी 8.6 लाख रुपये जिंकले होते. त्यानंतर तिकीट टू फिनालेच्या टास्कमध्ये जो सदस्य जिंकेल त्याची किंमत बक्षिसाच्या रक्कमेत वाढवण्यात येणार होती. ज्यामध्ये सूरज जिंकला, त्यामुळे बक्षिसाच्या रक्कमेत अजून 6 लाख रुपये जमा झाले. आता बिग बॉस मराठी विजेत्याला बक्षिस म्हणून 14.6 लाख रुपये दिले जातील.
हे ही वाचा -