एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या विजेत्याला मिळणारी रक्कम किती? जाणून घ्या

Bigg Boss Marathi Prize Money : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा आज ग्रँड फिनाले पार पडणार असून विजेत्याला मिळणार बक्षिसाची रक्कम जाणून घ्या.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale : छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा 'बॉस' म्हणजेच बिग बॉस मराठी शोचा यंदाचा सीझन प्रचंड गाजला 28 जुलै रोजी सुरु झालेला सदस्यांचा हा प्रवास 14 आठवडे म्हणजे 70 दिवसांनी आज 6 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या सीझनला महाराष्ट्राने भरभरुन प्रेम दिलं. टीआरपीच्या बाबतीत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनने आधीच्या सीझनचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत.

बिग बॉस मराठी 5 चा विजेता कोण?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या विजेत्याची आज घोषणा होईल. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. गेल्या काही आठवड्यापासून शोपासून दूर असलेला महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख आज पुन्हा एकदा आपल्या लयभारी स्टाईलने ग्रँड फिनाले होस्ट करणार आहे. आपल्या आवडत्या सदस्याला जिंकवण्यासाठी बिग बॉसप्रेमींनी सदस्यांना भरभरून व्होटिंग केलं आहे. दरम्यान, बिग बॉस मराठी जिंकणाऱ्याला किती रुपये धनराशी मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बिग बॉस मराठी सीझन 5 जिंकल्यावर मिळणार बक्षिसाची रक्कम किती ते जाणून घ्या. 

बिग बॉस मराठी 5 च्या विजेत्याला किती बक्षीस मिळणार?

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाच्या विजेत्यासाठी 25 लाख रुपये बक्षीस ठेवण्यात आलं होतं, पण घरातील सदस्यांनी वेगवेगळ्या टास्कमध्ये ही रक्कम जिंकावी लागणार होती. यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी चक्रव्यूह टास्कमध्ये 25 लाख रुपयांपैकी 8.6 लाख रुपये जिंकले होते. त्यानंतर पहिल्या तिकीट टू फिनालेच्या टास्कनंतर बिग बॉस मराठी सीझन 5 च्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेत वाढ झाली. या टास्कमध्ये स्पर्धकांना त्यांची किंमत ठरवायची होती. जो सदस्य टास्क जिंकेल त्याची किंमत बक्षिसाच्या रकमेत वाढवण्यात येणार होती. सूरजने हा टास्क जिंकल्यावर त्याची किंमत सहा लाख रुपये बक्षिसाच्या रकमेत जमा झाल्याने बिग बॉस मराठी विजेत्याच्या बक्षिसाठी रक्कम आता 14.6 लाख रुपये झाली आहे.

आज बिग बॉस मराठी 5 चा ग्रँड फिनाले

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या टॉप 6 सदस्यांमध्ये आज ग्रँड फिनाले पार पडेल. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यापैकी एका सदस्याचं नाव बिग बॉस मराठी सीझन 5 च्या ट्रॉफीवर कोरलं जाईल. आज बिग बॉस सीझन 5 चा विजेता मिळेल. त्याआधी बिग बॉस नवीन ट्विस्ट आणणार का आणि बक्षिसाच्या रकमेत वाढ करत स्पर्धकांना सुखद धक्का देणार का, हे आज ग्रँड फिनालेमध्ये पाहावं लागणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणची संपूर्ण सीझनची फी निक्कीच्या एका आठवड्याच्या फीपेक्षाही कमी, बिग बॉस मराठीसाठी 'गुलिगत किंग'ला किती पैसे मिळाले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धाBadlapur Case : चिमुकलीच्या कुटुंबाचं एन्काउंटरवरून फायरिंगMalad Bridge Inauguration : उद्घाटनाचा मुद्दा; काँग्रेस भाजपात राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget