एक्स्प्लोर

Telly Masala : बिग बॉस 18 च्या घरात गाढवाची एन्ट्री ते अनन्या पांडेला गंभीर मानसिक आजार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या व्होटिंग ट्रेंड्समध्ये सूरज चव्हाण आघाडीवर, निक्की आणि अभिजीतही शर्यतीत; ट्रॉफीवर कोण नाव कोरणार?

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा आज ग्रँड फिनाले पार पडणार आहे. बिग बॉसच्या घरातील 14 आठवड्यांचा प्रवास आज संपणार असून यंदाच्या सीझनचा विजेता मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहा फायनलिस्ट आहेत. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18: बिगबॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच हा ट्विस्ट, नव्या पर्वाच्या सुरुवातीलाच टॉप-2 फायनलिस्ट सांगितले, सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का

Big boss 18: बिग बॉस मराठीची सांगता आणि हिंदी बिग बॉसच्या 18 व्या सीजन ची सुरुवात एकाच दिवशी होत असल्याने प्रेक्षकांना या शोची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. आज पासून बिग बॉस 18 च्या पर्वाची सुरुवात होणार असून बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच शोच्या पहिल्याच दिवशी  बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या टॉक टू स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. याचा प्रोमो देखील सध्या व्हायरल झाला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Ananya Panday : अनन्या पांडे गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त, काय आहे इंम्पोस्टर सिन्ड्रोम? वाचा सविस्तर

Ananya Pandey : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे अलिकडे तिच्या 'कॉल मी बे' वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे. कॉल मी बे वेब सीरिजला ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून ती कधी प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. पण, अनेकांना हे माहित नसेल की, तिला गंभीर आजार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Vidya Balan: कमी बजेटमुळं विद्याला कारमध्ये कपडे बदलावे लागले, दिग्दर्शकानंच केला खुलासा, म्हणाला..काळ्या कपड्यानं कार झाकायचो

Vidya Balan: बॉलिवूडचे अनेक चित्रपट सध्या पुर्नप्रदर्शित होत असल्यानं चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून अनेक  सिनेमांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सुजॉय घोषचा  2012 साली प्रदर्शित झालेला कहानी सिनेमा आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटगृहात सुजॉयची कहानी प्रेक्षकांची दाद मिळवताना दिसतेय. या चित्रपटाला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे दिग्दर्शक सुजॉयनं या सिनेमाच्या काही आठवणी सांगितल्या. दर्जेदार गोष्ट असूनही केवळ टाईट बजेटमुळे विद्या बालनला शुटिंगदरम्यान कारमध्ये कपडे बदलावे लागत असल्याचा खुलासा या दिग्दर्शकानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18 : सलमान खानच्या बिग बॉस 18 मध्ये गाढवाचीही एन्ट्री, सदस्यांसोबत घरातच राहणार, एका स्पर्धकासोबत आहे खास कनेक्शन

Bigg Boss 18 Grand Premier : बिग बॉसचा 18 वा नवा सीझन आजपासून सुरु होणार आहे. सलमान खानचा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर झाले आहेत .बिग बॉस 18 चा ग्रँड प्रीमियर 6 ऑक्टोबर होणार आहे. बिग बॉस 18 चा प्रीमियर जसजसा जवळ येत आहे तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. 'भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य' ही यंदाच्या बिग बॉसची थीम आहे. बिग बॉसच्या घरात यंदा कोण स्पर्धक असतील हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यंदाच्या काही स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget