Aamir Khan On Girlfriend Gauri: आमिर खाननं गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसाठी हायर केली प्रायव्हेस सिक्योरिटी? मीडिया अन् पॅपाराझींनाही केली 'खास' विनंती
Aamir Khan On Girlfriend Gauri: आमिर खाननं अलिकडेच त्याच्या वाढदिवसापूर्वीच्या सेलिब्रेशनमध्ये गौरी स्प्रॅटला डेट करत असल्याचं कबूल केलं. सुपरस्टारनं सांगितलं की, तो आणि गौरी 25 वर्षांपासून मित्र आहेत.

Aamir Khan On Girlfriend Gauri: आमिर खाननं (Aamir Khan) नुकताच त्याचा 60वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदरच सुपरस्टारनं (Superstar) त्याचा खास दिवस, मीडिया आणि पॅपाराझींसोबत साजरा केला. यावेळी आमिर खाननं सर्वांना त्याच्या आयुष्यातील, त्याच्या नव्या जोडीदाराची ओळख करुन दिली. तसेच, दोघेही सध्या रिलेशनशिपमध्ये (Relationship) असल्याचा खुलासाही केला. साठीलेल्या टेकलेल्या आमिर खानच्या नव्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) आहे आणि कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आमिरनं त्याच्या नव्या गर्लफ्रेंडसाठी खासगी सिक्योरिटी हायर केली आहे.
आमिर खाननं मीडियासमोर त्याच्या नव्या नात्याचा खुलासा केला. त्यानं गौरीला आधीच याची कल्पना दिली होती. त्यानं माध्यमांना त्याच्या प्रायव्हसीचा आदर ठेवण्याची विनंती केली. आमिर म्हणाला की, "मी तिला हा प्रसंग कसा असेल, मीडियाचं वागणं कसं असेल, यासाठी काही प्रमाणात तयार केलं आहे. तिला या सर्व गोष्टींची सवय नाही. पण आम्हाला आशा आहे की, तुम्ही तेवढे दयाळु आहात..."
गर्लफ्रेंड गौरीसाठी आमिर खानकडून प्रायव्हेट सिक्योरिटी हायर
आमिर खानला विचारण्यात आलं की, तो गौरी स्प्रॅटसाठी सिक्योरिटी ठेवणार आहे का? यावर सुपरस्टारनं सांगितलं की, त्यानं हे आधीच केलं आहे. तो म्हणाला की, "मी ते आधीच केले आहे. पण हे फक्त माझ्या स्वतःच्या शांतीसाठी आहे." गौरी स्प्रॅटची मीडियाशी ओळख करून देताना आमिर खान म्हणाला होता, "मी अशा व्यक्तीच्या शोधात होतो, जिच्यासोबत मी शांत राहू शकेन, जी मला शांती देऊ शकेल आणि ती हिच आहे. गौरी आणि मी 25 वर्षांपूर्वी भेटलो होतो आणि आता आम्ही जोडीदार आहोत. आम्ही एकमेकांबाबत खूप सिरिअस आणि कमिटेड आहोत. आम्ही दीड वर्षांपासून एकत्र आहोत."
आमिर खान अन् गौरीशी लग्न करणार?
गौरी स्प्रॅटशी लग्न करण्याच्या प्रश्नावर आमिर खान म्हणाला होता की, "मला माहीत नाही की, मला वयाच्या 60 व्या वर्षी लग् करणं शोभेल की, नाही. माझी मुलं खूप आनंदी आहेत. मी खूप भाग्यवान आहे की, माझं माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नींशी देखील इतके चांगले संबंध आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Amir Khan New Girlfriend: आमिर खानच्या गर्लफ्रेंडला आहे 6 वर्षांचा मुलगा; कोण आहे गौरी स्प्रॅट?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
