एक्स्प्लोर
Advertisement
बायको कपडे धुवायला, घरकामं करायला सांगायची, त्रासाला कंटाळून प्रेमविवाह केलेल्या तरुणाची पुण्यात आत्महत्या
चार वर्षांपूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही आधी नोकरी करायचे. मात्र मुल झाल्यावर बायकोने नोकरी सोडली. यानंतर तिने नवऱ्याला त्रास द्यायला सुरुवात केली.
पुणे : प्रेम करुन लग्न केल्यानंतर देखील ते टीकेलच असं नाही. प्रेमविवाह करुन घटस्फोट झाल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. मात्र प्रेमविवाह केल्यानंतर बायकोच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडली आहे पुण्यात. इन मिन चार वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या एका तरुणाने बायकोच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. 'बायको कपडे धुवायला सांगते, घरकाम करून घेते' या त्रासाला कंटाळून या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या मगरपट्टा सिटीतील जिनिया सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणय खुटाळ (29) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी कनिका खुटाळ हिच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रणयची आई संगिता खुटाळ (49) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे प्रणय आणि कनिका यांना एक मुल देखील आहे.
प्रणय आणि कनिकाचा चार वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. प्रणय हा मूळचा इंदोर येथूल असून कनिका ही भोपाळची आहे. कनिका सध्या गृहिणी असून प्रणय एका खासगी कंपनीत कामाला होता. कनिका एका नामांकित कंपनीत नोकरी करत होती. पण, लग्नानंतर त्यांना मुल झाल्यानंतर कनिकाने आपली नोकरी सोडली होती. प्रणय आणि कनिका हे दोघेजण आपल्या मुलासह मगरपट्टा सिटीतील जिनिया इमारतीत राहायला होते.
गेल्या काही दिवसांपासून कनिका प्रणयला शारिरीक आणि मानसिक त्रास देत होती. प्रणय कामाला जाण्यापूर्वी तिचे कपडे धुण्यास सांगून घरातील कामे करून घेत होती. तसेच, सातत्याने प्रणयची मानहानी करीत होती. कनिकाने स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेण्याच्या कारणातूनही प्रणयला वारंवार त्रास दिला. त्यामुळे त्रासाला कंटाळून प्रण याने तीन दिवसांपूर्वी राहत्या घरी बेडशीटच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक व्ही. ए. भाबड हे अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement