सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
आपलं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी आपल्या डोळ्यात पाणी आलं होतं असं वक्तव्य महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
Chandrashekhar Bawankule : 2019 ला आपल्या सोबत बेईमानी झाली होती. देवेंद्र फडणवीस यांना चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. आपलं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी आपल्या डोळ्यात पाणी आलं होतं असं वक्तव्य महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत असंही ते म्हणाले. शिर्डीत आजपासून भाजपचे अधिवेशन पार पडत आहे, या अधिवेशनात बोलताना बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं.
कार्यकर्त्यांनी मदत केल्यामुळे मी अध्यक्ष म्हणुन चांगलं काम करु शकलो
मी कोल्हापुरात म्हटलो होतो की महायुतीचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. कार्यकर्ते कामाला लागले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असे बावनकुळे म्हणाले. त्यांचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर नाही पण आझाद मैदानावर झाला आणि पुन्हा एकदा डोळ्यात आनंदाश्रू पाहायाला मिळाल्याचे बावनकुळे म्हणाले. श्रद्धा आणि सबुरी महत्वाची आहे. मतदारांनी आपल्याला भरघोस मतदान केलं. पदाधिकारी यांनी जिवाच रान केल म्हणून आपल्याला यश मिळाल्याचे बावनकुळे म्हणाले. त्यांच्यासाठी हे अधिवेशन आहे. कार्यकर्त्यांनी मदत केल्यामुळे मी अध्यक्ष म्हणुन चांगलं काम करु शकलो. महाराष्ट्रात धन्यवाद मोदी जी असा कार्यक्रम घेतला पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदीजी यांच्या कामावर विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदीजी यांच्या कामावर विश्वास होता. विधानसभा निवडणूक आपण ग्रामपंचायतीप्रमाणे लढलो. लोकसभेला खोटा प्रचार विरोधकांनी केला. त्यात आपल्याला फटका बसला. त्यातून आपण खचलो नाही, तर लढलो असेही बावनकुळे म्हणाले. विधानसभा निवडणुका आपण जिंकणार आहोत असं अमित शाह यांना सांगून, कामाला लागा असा आदेश दिल्याचे बावनकुळे म्हणाले. सरकारने संघटनेला मजबूत करायचं असतं आणि सरकारने तळागाळातील लोकांना न्याय द्यायचा असतो असेही ते म्हणाले. दीड कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आपल्याला 20 तारखेपर्यंत करायचा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यात आपल्याला महायुतीची तयारी करायची आहे. पक्षाचीही तयारी करायची आहे. तुम्ही आम्हाला सत्तेवर बसवले आहे, आता तुम्हाला सत्तेत आणायचं आहे असंही बावनकुळे म्हणाले. शिर्डीत आज भाजपचे अधिवेशन पार पडत आहेत. या अधिवेशनासाठी भाजपचे दिग्गज नेते शिर्डीत दाखल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या: