Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने एका हॉटेलमध्ये चक्क हॉटेल कर्मचाऱ्याला बंदूक दाखवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
नाशिक: आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने एका हॉटेलमध्ये चक्क हॉटेल कर्मचाऱ्याला बंदूक दाखवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात विशाल झगडे याला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर नाशिक रोड येथील एका हॉटेलमध्ये विशाल झगडे आणि त्याचे दोन साथीदार हे जेवायला गेले होते. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यास त्यांनी बोलावून शिवीगाळ केली आणि त्यावरून झालेल्या बाचाबाचीत नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या विशाल झगडे या सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने थेट बंदूक काढून धमकावले.
या प्रकरणी विशाल झगडे याचा विरोधात नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल झालाय. विशाल झगडे याला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना हॉटेलमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या व्हिडिओच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करत आहे.
वाल्मिक कराडचा पिस्तूल परवाना रद्द
गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतानाही बीड जिल्ह्यातील अनेक जणांकडे पिस्तूल परवाने होते. यापैकी 300 पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले आहेत. खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याचेही पिस्तूल परवाना आता रद्द करण्यात आला आहे. वाल्मीक कराड वरती एकूण 14 गुन्हे होते. त्या गुन्ह्यापैकी दहा गुन्हे निकाली निघाले असले तरी चार गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. वाल्मिक कराड (Walmik Karad)याने 1996 मध्ये पिस्तूल परवाना मिळवला होता. तो आता रद्द करण्यात आला आहे.
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या
पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाकड पोलिसांनी महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या ताब्यातून तिन चार चाकी वाहन आणि चार चाकी वाहनांच्या बनावट चाव्या असा जवळपास 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ही जप्त केला आहे. अल्ताफ कासम अत्तार, जुबेर कयामुद्दिन कुरेशी, मुसाहिद अलिहास खान आणि जानिशार कमर आली अशी या चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या चारही आरोपीकडून पोलिसांनी चार चाकी वाहन चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. यात पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील चार चाकी वाहन चोरीच्या गुन्ह्याचाही सहभाग असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलिस उप आयुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे.
आणखी वाचा