jacqueline fernandez and sukesh chandrasekhar : मला 7 हजार 640 कोटींच्या उत्पन्नावर टॅक्स भरायचा आहे! जॅकलिन फर्नांडिसचा एक्स बाॅडफ्रेंड काय काय म्हणाला?
सुकेशने सांगितले की, त्याचा व्यवसाय अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई आणि हाँगकाँगमध्ये सुरू आहे. भारतातील सर्व प्रलंबित आयकर वसुली आणि अपील निकाली काढण्यास ते तयार असल्याचेही त्याने म्हटले आहे.
Jacqueline Fernandez and Sukesh Chandrasekhar : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली 2015 मध्ये अटक करण्यात आलेला ठग आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा एक्स बाॅयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये 2024 साठी 7,640 कोटी रुपयांचे घोषित विदेशी उत्पन्न संबंधित सरकारी कर योजनेंतर्गत समाविष्ट करण्याचे आवाहन केले आहे. सुकेशने निर्मला सीतारामन यांना एका पत्राद्वारे कळवले की, नेवाडा आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणीकृत असलेले त्यांचे परदेशी व्यवसाय, एलएस होल्डिंग्ज इंटरनॅशनल आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन, ऑनलाइन आणि ऑफलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीमध्ये गुंतलेले आहेत.
फसवणुकीचा आरोप असलेल्या सुकेशने लिहिले की, यासाठी मी 2024 सालासाठी माझे 7,640 कोटी रुपयांचे वैध विदेशी उत्पन्न जाहीर करत आहे. तसेच, भारतीय कर कायद्यानुसार तत्परतेने योग्य कर भरण्याची इच्छा आहे.
View this post on Instagram
यूएस ते दुबई व्यवसाय
सुकेशने सांगितले की, त्याचा व्यवसाय अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई आणि हाँगकाँगमध्ये सुरू आहे. भारतातील सर्व प्रलंबित आयकर वसुली आणि अपील निकाली काढण्यास ते तयार असल्याचेही त्याने म्हटले आहे. सुकेश चंद्रशेखरनेपंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. सुकेशच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांना त्याच्या परदेशी उत्पन्नावर कर भरून आणि देशात गुंतवणूक करून भारताच्या विकासात योगदान द्यायचे आहे.
View this post on Instagram
माझ्या परदेशी उत्पन्नावर स्वेच्छेने भारतीय कर भरेन
सुकेशने आपल्या पत्रात लिहिले आहे की, आजपासून, एक अभिमानी भारतीय म्हणून, आपल्या पंतप्रधान मोदीजींच्या महान नेतृत्वाखाली, मला या महान राष्ट्राच्या जागतिक स्तरावरील विकासात योगदान द्यायचे आहे. त्याने पुढे लिहिले की, आतापासून मी माझ्या परदेशी उत्पन्नावर स्वेच्छेने भारतीय कर भरेन. सुकेशने लिहिले की, तो त्याचे परकीय उत्पन्न भारतात गुंतवणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या