Dharmaveer : 'धर्मवीर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात; तीन दिवसांत केली कोट्यवधींची कमाई
Dharmaveer : 'धर्मवीर' सिनेमाचा प्रेक्षकांचा प्रेक्षकांनी बुकिंग चार्टदेखील भगवा केला आहे.
Dharmaveer : लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer mukkam post thane) हा सिनेमा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात केली आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कोट्यवधींची कमाई करत आहे. तीन दिवसांत या सिनेमाने 9.59 कोटींची कमाई केली आहे.
तीन दिवसांत 9.59 कोटींची कमाई
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा 13 मे ला शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 2.5 कोटींची कमाई करत विक्रमी सुरुवात केली होती. आता तीन दिवसांत या सिनेमाने 9.59 कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहत आहेत.
प्रेक्षकांनी बुकिंग चार्टदेखील केला भगवा
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचे टिकीट प्रेक्षकांना बूक माय शोवर बूक करता येत आहे. या सिनेमाचे प्रेक्षक प्री बूकिंगदेखील करून ठेवत आहेत. विकेंडला सिनेप्रेक्षक तसेच अनेक शिवसैनिक ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहायला गेले होते. रविवारी या सिनेमाने तीन कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच या प्रेक्षकांनी आणि शिवसैनिकांनी बुकिंग चार्टदेखील भगवा केला आहे.
View this post on Instagram
10,000 हून अधिक शोज
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचे 10,000 हून अधिक शोज लागले आहेत. तसेच प्रत्येक शो हाऊसफुल होत आहे. सिनेमातील प्रत्येक कलाकाराचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा सिनेमा सुरू असताना प्रेक्षक सिनेमागृहात टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज करत असतात. तसेच हा सिनेमा पाहताना अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले.
प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या