एक्स्प्लोर

Adah Sharma Health Update : 'द केरळ स्टोरी'फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात; ट्वीट करत दिली हेल्थ अपडेट

Adah Sharma : 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाला होता. ट्वीट शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.

Adah Sharma Health Update : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) चर्चेत आली. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. दरम्यान अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 

'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना या सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) आणि अभिनेत्री अदा शर्मा 14 मे रोजी एका हिंदू यात्रेता सहभागी होण्यासाठी करीमनगरला जात होते. दरम्यान त्यांचा अपघात झाला. 

अदा शर्माने दिली हेल्थ अपडेट (Adah Sharma Tweet)

अदा शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. तिने ट्वीट करत लिहिलं आहे,"मित्रांनो मी ठीक आहे. आमच्या अपघातासंदर्भात अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण माझ्यासह आमच्या टीममधील सर्व मंडळी ठीक आहेत. कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद". 

सुदिप्तो सेन यांनी दिली अपघाताची माहिती

'द केरळ स्टोरी' या सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी ट्वीट करत अपघाताबद्दल माहिती दिली होती. त्यांनी ट्वीट केलं होतं,"आज आम्ही करीमनगरातील एका मेळाव्यात आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जात होतो. पण, दुर्दैवाने अपघातामुळे आम्हाला पुढचा प्रवास करता आला नाही. करीमनगरच्या जनतेची मी मनापासून माफी मागतो. आमच्या मुलींना वाचवण्यासाठी आम्ही सिनेमा बनवला आहे. कृपया आम्हाला पाठिंबा देत राहा". 

'द केरळ स्टोरी'ने 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील!

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा शनिवारी 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 2023 मधील हा चौथा चित्रपट आहे, ज्याने 100 कोटींचा आकडा गाठला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल शाह (Vipul Shah) यांनी निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'ची एक्सप्रेस सुसाट; बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींपेक्षा अधिक कमाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget