The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'ची एक्सप्रेस सुसाट; बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींपेक्षा अधिक कमाई
The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
The Kerala Story Box Office Collection : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. ओपनिंग डेपासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता रिलीजच्या दुसऱ्याच आठवड्यात हा सिनेमा 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील झाला आहे.
'द केरळ स्टोरी'च्या कमाईबद्दल जाणून घ्या... (The Kerala Story Box Office Collection Day 9)
अदा शर्मा (Adah Sharma) स्टारर 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पण तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 50 कोटींचा टप्पा पार केला होता.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाने रिलीजच्या नवव्या दिवशी 19.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 112.87 कोटींचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडलाच या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. वीकेंडला हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेप्रेमी मोठ्या संख्येने जात आहेत.
- पहिला दिवस - 8.05 कोटी
- दुसरा दिवस - 11.01 कोटी
- तिसरा दिवस - 16.43 कोटी
- चौथा दिवस - 10.03 कोटी
- पाचवा दिवस - 11.07 कोटी
- सहावा दिवस - 12.01 कोटी
- सातवा दिवस - 12.54 कोटी
- आठवा दिवस - 12.23 कोटी
- नऊवा दिवस - 19.50 कोटी
100 कोटींचा टप्पा पार करणारा 'या' वर्षातला चौथा सिनेमा 'द केरळ स्टोरी'
'द केरळ स्टोटी' या सिनेमासह या वर्षात शाहरुखच्या 'पठाण', रणबीरच्या 'तू झूठी मैं मक्कार' आणि सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमांनी 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती.
View this post on Instagram
'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धि इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.
संबंधित बातम्या