Teen Adkun Sitaram : 'मासे असो वा माणसे, व्यवस्थित जाळं टाकलं तर...'; 'तीन अडकून सीताराम' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Teen Adkun Sitaram : 'तीन अडकून सीताराम' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Teen Adkun Sitaram : 'तीन अडकून सीताराम' (Teen Adkun Sitaram) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं असून प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'तीन अडकून सीताराम'मध्ये वैभव, संकर्षण आलोक आणि प्राजक्ता अडकले आहेत.
हृषिकेश जोशी लिखित-दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' हा सिनेमा येत्या 29 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या घोषणेपासूनच यात नेमकं काय आहे, याविषयी अनेकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे आणि या उत्सुकतेचे कारण म्हणजे चित्रपटाचे नाव. दुनिया गेली तेल लावत अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाचे एक नवीन पोस्टर समोर आले आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'तीन अडकून सीताराम'
'तीन अडकून सीताराम' या सिनेमात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य या सिनेमाचे निर्माते आहेत.
View this post on Instagram
पहिल्या पोस्टरमध्ये दिसलेल्या बेड्या आता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे आणि आलोक राजवाडेच्या हातात असून ते गजाआड आहेत. त्यांच्या सोबत त्यांची साथीदार प्राजक्ता माळी दिसत आहेत. त्यामुळे आता हे कोणत्या कारणासाठी जेलमध्ये आहेत, आणि बाकीचे त्यांना का अशा नजरेने बघत आहेत तसेच चित्रपटाच्या नावाशी या सगळ्याचा नेमका काय संबंध आहे, याचे उत्तर सिनेमा पाहिल्यावरच मिळेल.
'तीन अडकून सीताराम' विनोदी आणि कौटुंबिक सिनेमा
'तीन अडकून सीताराम' या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणाले,"हा एक कमाल विनोदी आणि कौटुंबिक सिनेमा असून प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. सिनेमाची संपूर्ण टीम मुळात भन्नाट आहे. कलाकार, निर्माते, संगीत टीम अशा सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. आम्ही आमच्या बाजूने प्रेक्षकांना शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. आता आम्हाला प्रतीक्षा आहे ती प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची. हृषिकेश जोशी यांनी या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"मासे असो वा माणसे..व्यवस्थित जाळं टाकल्यावर अडकणारच!"
संबंधित बातम्या
Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तीन अडकून सीताराम'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

